अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा उमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची तस्करी सुरुच
चंद्रपूर : - चिमूर नगर परिषद क्षेत्रात येत असलेल्या काग सोनेगाव येथील रेती घाटावर गेल्या 5 दिवसांपासून भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. आणि काल दि.24/04/2021 ला ठिक 5.00 वाजताच्या सुमारास तहसीलदार नागतिळक, उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी व इतर संबधित अधिकाऱ्यानी उपोषण स्थळावर भेट दिली मात्र मागण्याचे सात्वन न करता प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कायदेशीर लिलाव झाल्याचे सांगून अवैध रेती तस्कर चालक मालकाला ऐनकेन प्रकारे प्रोत्साहन देण्यात येत आहे.
उपोषणकर्त्यांना धमकावून बिंदास्तपणे दुसऱ्या दिवशी सुद्धा रेती उत्खनन करण्याची मुभा या अवैधरित्या रेतीची तस्करी करणाऱ्या चालक मालकाला दिली जात आहे. याचाच अर्थ असा की ज्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने हि रेती बिना रायल्टी उपसा केली जाते हि खेदाची बाब आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!