चिमूर शहरातील हिलींग टच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे कोविड रुग्णांची नावे व व्हिडीओ क्लिप व्हॉट्सअप च्या माध्यमातून दैनंदिन होत असतात वायरल
जिल्हाधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाचे याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - शासनातर्फे कोविड रुग्णाच्या नावाचे उघड करू नये व त्यांच्यावर हसू नये त्याबाबतची व्हिडीओज वायरल करून कुणाची मने दुखवू नये असे आदेश असतांना सुद्धा चिमूर शहरातील हिलींग टच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चा साईनाथ उर्फ अश्वमेघ बुटके हा व्यक्ती दलाल बनून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल च्या बाहेरूनच १ लाख ५० हजार रुपये असेल तरच याठिकाणी उपचार करण्यात येईल अन्यथा तुम्ही तुमचा रुग्णास जिथे दाखवायचं आहे तिथे नेऊ शकता असे बोलीत असतो अशावेळी ऑक्सिजन ची अत्यावश्यक असता रुग्णांचे नातेवाईक व त्यांचे आई वडील नातेसंबंधी हे पैशाची जमवा - जमव करीत असतांना वेळ निघून गेलेली असते आणि रुग्णाचा त्यावेळी जीव गेलेला असतो.
यावरही चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी शासकिय GR व दरपत्रक जनतेत वायरल केले असता संपूर्ण तपासणी फी हि फक्त ९००० रुपये आहे.जर यापेक्षाही रुग्णांकडून जास्त फी आकारली जात असल्यास ०७१७२ - २७४१६१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावे व त्यांचेवर दंडात्मक व कायदेशीर रित्या कारवाई करण्यात येईल.असे आदेश असतांना सुद्धा सर्रासपणे आदेशाचे पालन न करता उल्लंघन केले जात आहे.हे सर्व चिमूर वासीय अधिकारी तथा डॉक्टरांना माहित असून सुद्धा याबाबतची तक्रार दाखल करून कारवाई का करण्यात आली नाही ? पैशाअभावी अनेकांना या रुग्णालयात व रुग्णालयाच्या बाहेर जीव गमवावा लागला. असे असतांना सुद्धा हे दलाल रुग्णांचे व्हिडीओ तयार करून जनतेत वायरल करीत आहे.यांच्यावर शासनानुमते कारवाई करायला हवी अन्यथा या रोगापासून बचावणारा रुग्ण विनाकारण मारल्या जाईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!