खोब्रागडेजी का एक ही नारा दारू बेचणेवालो को साथ है हमारा
तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - 1 एप्रिल 2021 पासून दारू सुरू होणारचं या निर्णयाकडे मद्यशोकींन आतुरतेने वाट बघत होते. तर आता लीगल दारू सुरू होणारच त्यामुळे की काय पोलीस विभागाने सुद्धा अवैध दारू विक्रेत्यांसमोर नांगी टाकत जिओ और जिने दो मनःत बिन मोकाट दारू विक्रीचे अवैध परवाने वाटल्यागत वरोऱ्यातील गल्ली पासून तर हायवे पर्यंत पाहिजे तिथे दारू विक्री सुरू करण्यास परवानगी दिली आहे.पोलीस विभागाच्या कार्यवाहीच्या नावाखातीर लहान मास्याना पकडून गुन्हे लादल्या जात आहे तर मोठे अजगर मोकाट दारू विक्री करीत आहे.सहा वर्षाच्या कालावधी मध्ये फक्त लहानच एक पेटी,दोन पेटी विकणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्यात येते मात्र ज्या ठिकाणांहून अवैध दारूचा पुरवठा होतो अश्या एकाही ठोक दारू विक्रेत्यांवर कार्यवाही का कार्यवाही झालेली नाही हा एक संशोधन करण्याचा विषय आहे.ज्या डीलर कडून हा माल पुरविल्या जाते त्याचे नाव आज पर्यत पुढे न येणे हे एक कोडेच आहे की नाव न येण्यासाठी नगद नारायणरावाचा मोट्या प्रमाणात वापर होतो या विषयावर अर्थशास्त्र जानऱ्यानी प्रकाश टाकला पाहिजे.
वरोरा शहर व तालुक्यातील संपुर्ण परिस्थिती बघता नाका पेक्षा मोती जड झाल्यासारखी गत झाली आहे,शहरात जुना नागपूर नाका जवळ तर बार सुरू झालेला आहे तो पण कित्तेक महिन्या पासून बिनबोभाट व्हिस्की,बिअर,रम व देशी सर्वच प्रकारच्या दारू विक्रीचे बस्थान आहे मात्र या बाबत ठाणेदार दीपक खोब्रागडे यांना माहीत नसेल तर नवल आहे.मागे जे.बि. रेस्टॉरंट वर धाड टाकली ती पण एक व्हिडिओ वायरल झाल्यामुळे.शहराची ही बिकट परिस्थिती बघून अवैध दारूविक्री करणाऱ्याचे सुगीचे दिवस आल्या सारखी परिस्थिती आहे.वरोरा शहरात अवैध दारू विकणारे चिल्लर विक्रेते पाचशे ते सहाशे झाले आहे तर त्यांना घरपोच व जागेवर अवैध दारू पुरवणारे पन्नास च्या जवळ पास आहे व या पन्नास अवैध दारू वाल्याणा दारू पुरवठा करणारे 10 ते 15 ठोक विक्रेते आहे जे वर्धा,नागपूर,हिंगणघाट,वडकी,वणी,यवतमाळ,मारेगाव,जाम, माजरी, भद्रावती,चंद्रपूर येथील रहिवासी आहे.या ठोक विक्रेत्यांवर आज पर्यंत एकही गुन्हा का बरं नोंदविण्यात आला नाही ? मरतात तर लहान मासे मोठे मगरमच्छ मात्र मोकाट फिरत आहे. मागील ठाणेदार उमेश पाटील असतांना अवैध दारू विक्री वर काही प्रमाणात अंकुश होता व त्याच्या बाजीरावच्या सुताई ने कित्येकांनी आपले दारूचे धंदे काही प्रमाणात बंद सुद्धा केले होते मात्र नवीन ठाणेदार दीपक खोब्रागडे आल्यापासून जुना नागपूर नाका,मिलन चौक,रात्माला चौक,आनंदवन चौक,एकार्जुना चौक,शिवाजी चौक,बोर्डा चौक,इतकेच काय तर पोलीस स्टेशन समोरील रेल्वे स्टेशन जवळच मुबलक दारू उपलब्ध मिळते.शहरात प्रत्येक गल्ली व चौकात मिळत असलेल्या दारू,बिअर मुळे पोलिसांचा धाक चोरावर नसून तर शावावर असल्या सारखे झाले आहे.शहरात सर्वीकडे सम्पूर्ण दुकान बंद आहे मात्र अवैध दारू विकणाऱ्याचे दुकान पोलिसांच्या असीम आशीर्वादाने सुरू आहे.या प्रकारे शहराची दुरवस्था होत असताना वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार यांनी याकडे जातीने लक्ष देण्याची आता तरी गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!