क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार टाकूण अभिवादन
शंकरपूर (जगदिश पेंदाम)
पळसगांव (पिपर्डा) अखंड भारतात स्त्रीशिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक व जातीभेदाविरोधात बंड पेटविणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त पळसगांव तालुका चिमूर येथील अखिल भारतीय बौद्ध समाज व माळी महासंघाच्या वतीने महात्मा फुले,आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले. या वेळी नालंदा बौद्ध विहार येथे छोटे खाणी तरुण मुलाचे महात्मा फुले यांचे जीवनचरित्रवर या प्रकाश टाकण्यात आला कोविड 19 चे नियम पाळून भाषनाचा कार्यक्रमाचे आयोजन करून महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अ. भा. अद्यक्ष दामोदर रामटेके, सचिव,प्रभाकर गजभिये,नरेश पाटील ,सुरेश शेंडे,गीता शेंडे माजी सरपंच,शंकर वाटगुरे,तुकाराम गुरनुले,ज्ञानेश्वर गुरनुले,सरिता गुरनुले सरपंच,वैभव रामटेके,संदीप ढोक ,नागसेन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!