चिंचोली(बु)सामान्य लोकांपर्यंत भारतीय संविधान नेण्यात सरकार अपयशी..




बल्लारपूर) (वसंत मून) 

चिंचोली(बु)सामान्य लोकांपर्यंत भारतीय संविधान नेण्यात सरकार अपयशी.. 
एम.टी.साव सर.
BS-4,राष्ट्रीय अभियानंतर्गत दि.30/3/21 ला ठिक दोन वाजता आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित चिंचोली(बु),तहसील राजुरा येथे घेण्यात आला. मा.आबाजी पाटील ढुमणे, उपाध्यक्ष आदिवासी वि. कार्य.सह.संस्था,चिंचोली(बु)यांनी अध्यक्षता केली.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.अनिल भिमाजी मडावी,मा.दशरथ टेकाम,मा.खोब्रागडे मैम, मंचावर उपस्थित होते.येथे भारतीय संविधान सन्मान, सुरक्षा व संवर्धन, बिएस-फोर चा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी मा.दिवाकर मडावी जिल्हाध्यक्ष बामसेफ यांनी अभियान संदर्भात व त्यांचे लोकांपर्यंत भारतीय संविधान कां गेले नाही यावर भाष्य केले.संविधान लोकाभिमुख न झाल्याने देशातील वर्तमान राजकीय समस्या दिसुन येतात.ते समाजात जावे लोकांचा त्यातुन क्रुतिपुर्ण सहभाग नोंदवून संविधान आहे म्हणुन अधिकार आहेत हे  निक्षुण सांगितले. मा. एम.टी. साव सर राष्ट्रीय प्रशिक्षण सचिव यांनी खाऊजा  मुळे एससी/एसटी/ओबीसी यांच्या आरक्षणावर कशी गदा येत आहे हे आवर्जून सांगितले. शेतकरी धोरण,शिक्षण धोरण यांवर चर्चा केली.व येणारे दुष्परिणाम सांगितले.एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 85%लोकांना भारतीय संविधानातुन अधिकार मिळवुन दिले.तर त्या अधिकाराचा उपभोग घेणारे मात्र संवैधानिक अधिकार पुढच्या पिढीला हस्थांतरित करण्यात फार मोठा कसुर केल्याचे सांगितले.
    प्रास्ताविक भाषण मा.जि.के.उपरे (PPI-D), आणि संस्थेचे माजी उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य यांनी केले.या प्रसंगी जवळपास सात गावचे संस्थेचे पदा धिकारी व सदस्यांनी सहभाग घेतला.व प्रश्नोत्तरा नंतर मा.संस्थेचे सचिव मा.रामटेके यांनी आभार मानले. कार्यक्रमात मा.दाऊजी ठेंगरे,मा.प्रविण देवगडे,मा.सत्यपाल सहारे,मा.विनोद पिपरे,मा.राजु ,मा.धनराज बोटरे,मा.प्रशांत चंद्रागडे, मा.पाडुरंग खोब्रागडे, मा.रजनीकांत वाघमारे, मा.बंडुजी,मा.दादोजी बावणे ई.उपस्थित होते.जय भीम..जय मूलनिवासी...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!