कोरोना
कोरोना वर आधारित कविता
कवयित्री (सौ. रत्नमाला भोयर)
कोरोना म्हणजे एक अदृश्य विषाणू
पेरत आहे पृथ्वीवर सहस्त्र बीजानू
दाही दिशा हाहाकार माजला जणू
कुठे आहे तो कान्हा वाजवा म्हणा वेणू !!1!!
श्रीमंतांची मौजमजा विमानवारी
गरीबाना ती सजा उपाशी म्हातारी
चिली-पिली उंडारतात रस्तोरस्ती
हातावर पोट घेऊन बापये भटकती!!2!!
कोरोनाचा असा घाला जणू देवाला बळी
कधी घात होईल नकळ्त कोणत्या वेळी
जीव असा मुठीत आला बसली दातखूळी
मोजता येणार नाही कोरोनाचे बळी!!3!!
जादुगिरी फसवी आता उठ माणसा जागा हो
मानवतेचा पुजारी बनून मानूसकीचा धागा हो
कोलाहल जो पेटत आहे ,तो विझवण्या पाणी हो
भुकेल्या पोटास अन्न देण्या देवी अन्नपुर्ना हो!!4!!
वेळीच सावध होऊनी मानवा
घे वसा तु सावधानतेचा बरवा
कोरोनाची साखळी तोडावया
एकही क्षण तु घालवू नको वाया!!5!!
सुंदर तुझे हे मानव जिवन
परी न पाळशी कुठलेही नियम
इक्डून तिकडे उगा फिरकशी मरणाच्या दारात का? उगाच जाशी!!6!!
फिरुनी तुला का? हिरे-मोती मिळती
अरे बडबड्या, कोरोनाची बाळग भिती
थेट पंतप्रधान,मुख्यमंत्री विनंती
करती
घरी बस गुमान,तुजला सारे दंडवत घालती!!7!!
(सारखे विनाकारण उठ सुठ बाहेर जाणार्या बंधूसाठी)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!