जिल्ह्यातील रेती घाट लिलाव प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार उघडकीस अपर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह अनेकांचा सहभाग - सारंग दाभेकर

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - रेतीघाट लिलाव प्रक्रिया राबवितांना जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्याने तहसीलदार कडुन प्राप्त रेतीघाट लिलावाच्या  चुकीच्या व बनावटीच्या प्रस्तावाची कोणतीही पूर्व तपासणी न करता रेतीघाटाचे प्रस्ताव अपर जिल्हाधिकारी कडे लिलावाची अंतिम प्रक्रिया करण्यास सादर करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी यांनी खनीकर्म अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवून डोळे झाकुन खोट्या बनावटीच्या रेतीघाट लिलाव प्रस्तावावर बोली करून रेती घाट लिलाव केले व स्वाक्षरी केली. मौजा  काग (सोनेगाव) येथिल रेतीघाट महिला बचत गट काग या संस्थेला कां देण्यात आला नाही याबाबत प्रत्यक्ष जिल्हा कार्यालयात चौकशी केली असता तसेच माहीती अधिकार अधिनियमांतर्गत प्रत्यक्ष माहिती तपासली असता रेतीघाट लिलाव प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले असून तहसील मधिल लिलाव नस्ती हाताळणी करणाऱ्या पासून तहसीलदार खनीकर्म विभागातील अधिकारी कर्मचारी सोबतच अपर जिल्हाधिकारी यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे. त्यामुळेच पुराव्यांसह दिलेल्या तक्रारीची जिल्हा कार्यालया कडुन दखल घेतल्या जात नाही तर महसूल विभागाचे संपूर्ण शाखा माहीती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
सन 2021 मधिल लिलाव प्रक्रियेत चक्क 2019 चे जुने दस्तऐवज वापरण्यात आले याबाबत विचारणा केली असता तहसीलदार व खनीकर्म अधिकारी बेजबाबदारपणाने सांगतात की सन 2019 पासून Continues प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ग्रामसभांना विश्वासात घेण्याची गरज नाही. मग 2021 मध्ये नव्याने वृत्तपत्रातुन जाहिरात करून शासनाचा खर्च कां केला जाहिरात अगोदर करण्यात आली असेल असे विचारले असता त्यांचे उत्तर मिळाले नाही. अपर जिल्हाधिकारी ह्या तक्रारी प्रमाणे समाधान करू शकल्या नाहीत या उलट वारंवार माझे कडे येऊ नका  तुम्हाला उत्तर कळवू अशा संतापाने बोलल्या. तहसीलदार  अपर जिल्हाधिकारी अधिकारी खनीकर्म अधिकारी तलाठी यांचे वरील कर्तुत्व शंकास्पद असून यांनी रेतीघाट लिलावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची शंका नाकारता येत नाही. याबाबत योग्य न्याय न मिळाल्यास रेतीघाट तात्काळ बंद न केल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा सारंग दाभेकर यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!