जंगलात लावलेल्या वणव्यांमुळे मोठेगाव येथील पाच घरे जळून खाक
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - चिमूर तालुक्यातील मोठेगाव येथे गावाला लागून असलेल्या झुडपी जंगलामध्ये अचानक कोणी तरी आग लावली ही आग इतकी उग्र रूप धारण करीत थेट गावाच्या दिशेने आली या आगीत मोठेगाव येथील चार घरे जळण्याची घटना दि.31 मार्चला दुपारी 2 वाजता घडली.दुपारी 12 वाजताच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमाने जंगलामध्ये आग लावली परंतु जास्त हवा असल्यामुळे ती आग गावाच्या दिशेने पेटत पेटत आली त्यामध्ये मोठेगाव येथील चार घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये,बिरजू नेवारे, सुधाकर शेंडे, मंगेश नेवारे, राजू अडसोडे, बंडू नाने, यांच्या घराचे छप्पर जळून जीवनाउपयोगी वस्तू जळाल्या आहेत तसेच गावातील इतर व्यक्तींचे ठेवलेले तनशीचे ढिगारे सुद्धा जळुन खाक झाले.आटोक्यात आणण्यासाठी गावकरी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते. तेव्हा गावातील भा.ज.पा युवा कार्यकर्ते अजित सुकारे यांनी चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांना तात्काळ भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.आमदार बंटी भांगडिया यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रशासनाला भ्रमणध्वनीवरून संपर्क करून चिमूर तसेच नागभीड अग्निशामक दलाला पाचारण करून दोन्ही गाड्या मोठेगाव येथे तात्काळ पोहोचवीण्यास सांगितल्या.व त्या दोन्ही गाड्या मोठे गाव येथे पोहोचल्या या ठिकाणी चिमूरचे तहसीलदार सुध्दा घटनास्थळी पोहोचले नुकसान भरपाई चा पंचनामा करण्यात आला ही आग कशी लावली याची माहिती घेण्यात येत आहे या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही पोलीस विभागही आगीच्या ठिकाणी पोहोचले होते या वनव्याने जंगलाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे वनविभागाचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते.तसेच सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!