वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्याच्या आगडी गावातील मोहफुल वेचायला गेलेल्या एका महिलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. कल्पना नामदेव वाढई वय 54 असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या सर्वत्र मोहफुल आलेले आहेत. ग्रामिण भागात मजुरी नसल्यामुळे ग्रामिण भागातील लोक मोहफुल वेचुन आपले उदर निर्वाह करतात. आज सकाळी 11 वाजताचे सुमारास आगडी येथील कल्पना नामदेव वाढई वय 55 आणि तीची आई कौशल्या मांदाळे गावाला लागूनच असलेल्या जंगल परिसरात दोघेही मोहफुल वेचायला गेले.
मोहफुल खुप उशिरा पर्यंत पडत असल्याने मृत कल्पना वाढई हिची आई कौशल्या मांदाळे ही मातारी असुन ती जेवन करायला घरी आली. मात्र उशीर झाला तरी कल्पना घरी परत आली नसल्याने आजीने आपल्या नातवाला सांगितले. तेव्हा नातू उमेश जंगलात जाऊन कल्पनाचा शोध घेतला मात्र ती दिसली नाही. त्यानंतर तो गावामध्ये येऊन गवक-याना घेऊन गेले असता कक्ष क्रमांक 115 मध्ये कल्पना ही मृत अवस्तेत आढळुन आली.
अंगावरील घावामुळे वाघाने मारले हे समजतास ही माहिती गावकर्यांनी वनविभागाला दिली. येथील वनपाल प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले वनविभागाची चमू , चिरोली चौकीचे पठाण, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनबले, दामोधर लेनगुरे व गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!