मौजा शिवणपायली येथे सावित्री बाई फुले जयंती साजरी
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बौध्द महिला पंचकमेटी शिवणपायली व बौध्द पंचकमेटी शिवणपायली यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी गावातून धम्म रॅली काढण्यात आली व बुद्ध विहारात परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले व बुद्ध मूर्तिची पूजा करण्यात आली. आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करन्यात आले. जयंती दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी बौध्द भिख्खु धम्मवंश आणि बौध्द भिख्खु अनुत्तर उपस्थित होते़ आणि त्याच प्रमाणे या प्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून राजहंस डेकाटे अध्यक्ष बौध्द पंचकमेटी शिवणपायली बालकदास पाटील सचिव बौध्द पंचकमेटी शिवणपायली जनार्धन डेकाटे सामाजिक कार्यकर्ता कवडू पाटील अध्यक्ष नवयुवक बाहुदेशीय जनकल्यान संस्था शिवणपायली व संस्थेचे सचिव भीमराव वाळके ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. संचालन सुमेध डेकाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रणय पाटील यांनी केले.स्नेहभोजनाचा आनंद घेत या कार्यक्रमाची सांगता करन्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!