चिमूर तालुक्यातील सावरी (बिड) येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

सावारी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - दि.३ जानेवारी २०२१ रोजी  भारतीय स्त्री शिक्षणाच्या देवता पहिल्या भारतीय शिक्षिका व थोर समाजसुधारक व मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरी येथे जयंती संपन्न सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन तथा माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्राचे आयोजन येथील उच्च क्षेणी मुख्याध्यापक विलास हिंवज सर यांनी केले हिंवज सर यांनी सावित्रीबाईं फुले यांच्या कार्याची माहिती विषद केली. आजच्या स्त्रीयांनी सावित्रीबाईंच्या कार्याचे महत्व जाणून सावित्रीबाईंच्या विचारांना अंगिकारावे, असे सांगण्यात आले. सावित्रीबाईंच्या कार्याचा ध्यास घेवुन व त्यांनी केलेलया स्त्रीयांच्या हक्क तथा अधिकारी या विषयावर हिंवज सर यांनी माहिती विषद केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष सावरी तेथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सातपैसे प्रमुख पाहुणे सावरी येथील सरपंच सौ.शाताबाई वाकडे,माजी ग्रामपंचायत सदस्य ,अंबिकाबाई बैले , सावरी येथील ग्रामपंचायत सदस्य रवि शेन्डे व  कार्यक्रमाला सावरी येथील गावकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!