दारूसाठी नको करू रे गड्या मतदान

विशेष लेख

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
दारूसाठी नको करू रे गड्या मतदान

दारु साठी नको करु 
गड्या मतदान.    ३
दोन पैशासाठी नको
विकू स्वाभिमान    २ !!
एक ठेव ध्यानात
तेच कर जे असेल तुझ्या मनात 
जे सदैव असती सुखा दुखात  
त्यांनाच किंमत असते जनात
कुणी येऊन काही सांगेल
आधी त्याला पारख
सत्याचा पहिले शोध लाव
मग सिंहा वाणी डरक
कुणाही संग राहून
आगाव टेन्शन घेऊन
नको फुकटचा हा आपमान !!
दोन पैशासाठी नको
विकू स्वाभिमान....२  !!!
सत्याची साथ सोडू नको
कुणाचं खाऊन मटण  २
कुणाला मिंदा होऊ नको
नको दाबू गलत बटन
पाच वर्षे फुकट जातील
नाही येणार टाईम रिटर्न
लाचार होऊन जगण्यापेक्षा
आपल्या हित करत्याची ठेवा जान !!
दोन पैशासाठी नको
विकू स्वाभिमान ....२ !!!
विचार करा थोडा
द्वेषाची भावना सोडा  २
जे आपसात दुही लावतात
त्यांना शिकवा धडा
कोण चांगला कोण वाइट
यांची तुलना करा  २
यांच्या त्यांच्या कार्याचे
फरक आधी स्मरा
प्रकाश आवर्जून सांगतो
चांगल्या व्यक्तीचे ठेवा भान !!
दोन पैशासाठी नको       
विकू स्वाभिमान....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!