चिमूर नगर परिषद निवडणूक २०२० संदर्भात काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आली बैठक

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : - दिनांक.१७/११/२०२० चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगर परिषदेची जेमतेम दि.१०/११/२०२० ला  १७ प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत घेण्यात आली असतांना ९ महिला ९ प्रभागांसाठी आरक्षित ठरल्या आहे.व ४ प्रभागांसाठी जनरल तर अनुसूचित जमाती करीता १ त्याचबरोबर अनुसूचित जाती सर्वसाधारण करीता १ आणि अनुसूचित जमाती सर्वसाधारण करीता १ व नागरिकांच्या मागास प्रवर्ग याकरिता १ अशा एकूण १७ प्रभागांसाठी ईश्वर चिट्टी द्वारे आरक्षणाची सोडत करण्यात आली.याच अनुषंगाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली समस्त काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या समक्ष नगर परिषद निवडणूक २०२० करीता शेकडो ईच्छुुुक उमेदवारांची नावे देण्यात आली.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर , तालुका अध्यक्ष माधव बिरजे , राजू लोणारे , राजेश चौधरी , विनोद ढाकुनकर , ऍड दुधनकर , मनीष नंदेश्वर , तुषार काळे , तुषार शिंदे , नितीन कटारे , डॉ.रेहमान पठाण ,प्रा.घ्यार , अविनाश अगडे , विनोद राऊत , गौतम पाटील , पप्पू शेख ,मंगेश घ्यार , प्रशांत डवले , नाजमा पठाण , कल्पना इंदूरकर , उमेश हिंगे , विजय डाबरे , जाबीर कुरेशी व अन्य काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!