नवीन जावई व मुलींच्या हस्ते वृक्षारोपण

गुरुदेव सेवा मंडळ मांदेड यांचा सुस्ते ऊपक्रम

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - दिवाळी सणाला फार महत्व आहे . गरीब असो की श्रीमंत असो आपापल्या परीने दिवाळी सन साजरा करतात . पण सासरच्या मुलीला माहेरची आठवण असावी म्हणून यावर्षी लाखांदूर तालुक्यातील मांदेड या गावी गुरुदेव सेवा मंडळ तर्फे 11 मुलींचे लग्न झाले त्या मुलींना त्यांची आठवण म्हणून गुरुदेव सेवा मंडळातर्फे त्या मुलींच्या आई-वडिलांच्या घरी एक आठवण म्हणून दिवाळी व भाऊबीज निमित्त १७ नोव्हेंबर रोजी . नवीन जावई व मुलींच्या हस्ते आईवडिलांच्याच घरी येत्या आंब्याच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले .
    यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष वैजनाथ दिवटे , सदस्य मधुकर दिवटे , दिवाकर ढोरे , प्रभाकर ठाकरे , माजी सरपंच मुनेश्वर दिवटे , ग्रामपंचायत सदस्य अभिमन  ठाकरे , रामचंद्र लांडगे, रघुनाथ दिवटे व गावातील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!