वरोरा तालुक्यात होत आहे सर्रास दारू विक्री

दारू विक्रेत्यांना धंदा करायचा असेल तर अन्ना कडूनच माल घ्यावा नाही तर

वरोरा तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - दारू बंदी नंतरही वरोरा तहसीलमध्ये दारूची सर्रास विक्री होत आहे.  पोलिस आणि आबकरी उत्पादन शुल्क विभागाच्या नाकाखाली दररोज शेकडो दारूच्या पेट्या उतरवल्या जात आहेत.  अधिकाऱ्याच्या संगनमताने दारूची विक्री सुरूअसल्याची चर्चा आहे.  महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्हा दारूबंदी म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लाखो लोक खुश झाले पोलीस विभागणी कोट्यवधीं रुपयांची अवैध दारू पकडून हजारो आरोपीवर गुन्हे दाखल केले.  सुरवातिचे काही महिन्यांपर्यंत ही दारूबंदी यशस्वीही झाली, परंतु प्रत्येक वेळी अवैध दारू विक्रेत्यांना नवं नवीन युक्ती लढवून जिल्ह्यात दारू विक्री चालू केली त्यामुळे जिल्ह्यातील दारू बंदी अपयशी ठरली.  असे असले तरी आमच्या जाबाज पोलिस खात्याने आपल्या जीवाची बाजी लावत ल्यानंतर दारूबंदीची दारू काही प्रमाणात यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.  ज्यामध्ये आमचा जाबाज अधिकारी चिडे साहेब शहीद झाले. अवैध दारू विक्रीतून झटपट पैसे कमविण्याच्या प्रयत्नात काही सफेदपोश आणि गुंड अवैध दारू विक्रीमध्ये व्यस्त आहेत स्थानिक पोलिस प्रशासन त्यांना धारेवर धरत असून कारवाई करत आहे तर वरोरा उत्पादन शुल्क विभागाच्या बहुतांश वेळी कार्यालयाला कुलूप लागून असल्याचे पाहायला मिळत आहेत. तसे या दोन्ही विभागाने अवैध दारू विक्रेत्यांकडून कोट्यवधींचा मद्यसाठा जप्त करुन घेतला आहे.
 आता अवैध दारू विक्रेते निर्भय झाले असून ते शेकडो दारूचे भरले खोके वरोरा तालुक्यात उतरवत आहेत.  अन्ना मोठा विक्रेता म्हणून चर्चेत आला असून महिन्या काठी 12000 पेठ्या विक्री करण्याचे लक्ष्य ठेवून व्यवसाय करीत असल्याची चर्चा आहे.  हा अन्ना दुसर्‍याकडून पेठ्या घेतल्यास पोलिसांन कडून कारवाई करण्याचे संकेत देखील देतो आहे,यामुळे स्थानिक विक्रेत्याच्या मनात भीतीचे वातावरण केल्याची चर्चा आहे.  काल रात्री, वरोरा सर्कलमध्ये देशी दारू संत्रा 90 एमएल ब्याच क्रमांक 105 चे शाकेडो पेट्या उतरवल्या आहेत.  ही दारू कोठून आली हे तपासाचा भाग असून या भागात चर्चेचा विषय ठरला आहे.  आपले पोलिस , अधिकारी जे आपले जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत,त्यांना अवैध दारू विक्रेते चकमा देत जिल्ह्यात तालुक्यात अवैध दारू विक्री सर्रास पणे चालू असल्याने यावर पोलीस विभागाने नवीन उपाय योजना आखून दारू बंदी वास्तव्यात उतरवण्याची मागणी येथील जनता करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!