पळसगाव ते पेटगावं निर्माणधीन डांबरीकरण रस्त्याला पडले खड्डे
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगांव (पि) : - मासळ पळसगांव पेटगांव कडे जाणाऱ्या मार्गाचे नुकतेच डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र काही महिन्यातच निर्माणधीन रस्ताला मोठ - मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या अगोदरचा रस्ता ग्रामस्थांना बरा होता.असे म्हणण्याची वेळ आली या रोडकडे बघून होत आहे.या रस्त्यावर जड वाहतुकिची व मोठया वाहनांची नेहमी वर्दळ असल्याने सदर रस्ता पुन्हा उखडला असून रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणावर पडले आहे.यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे मुश्किल झाले आहे.अनेक अपघात दिवसेंदिवस या रोडवर होत आहे.या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला असून कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करून जलद गतीने निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे.खडीकरण आणि डांबराचा अत्यंत कमी वापर करण्यात आला आहे त्या रस्त्याची दुर्दशा बघून लोक प्रतिनिधी सुद्धा लक्ष का देत नाहीत ? याकडे जनतेचे वारंवार लक्ष वेधून घेत आहेत. संबंधित विभागाने या रस्त्याच्या कामाची पाहणी करून रस्त्याचे काम सुरळीतरित्या ईस्टीमेटच्या पद्धतीने करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!