हाथरस पिडितेला मुल येथे श्रद्धांजलीचे आयोजन...




अख्या देशाला हादरवनाऱ्या व माणुसकीला काळिमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडली असून त्याचे पडसाद देशभर उमटत आहे.

हाथरस येथील पिडीतेला योग्य न्याय देण्याची मागणी मुल तालुका आम आदमी पार्टीने केली आहे. गाव भुलगडी, जिल्हा हाथरस (उ. प्र.) येथील 19 वर्षीय विद्यार्थीनीवर नराधमाकडून अत्याचार करण्यात आला. उपचारादरम्यान पिडितेच्या मृत्यू झाला.

झालेल्या अत्याचाराच्या आम आदमी पार्टी शाखा मुल तालुका निषेध करीत असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. 5 ऑक्टोबर 2020 ला गांधी चौक मुल येथून ठिक 11 वाजता म. गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून, तोंडाला काळी फीत बांधून निषेध नोंदवत मुकपणे प्रशासकीय भवनापर्यंत मोर्चा  काढत, श्रद्धांजली अर्पण करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष गौरव शामकुळे, तालुका महिला आघाडी प्रमुख कुमुदिनी भोयर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!