जांभुळघाट येथील मुरूम उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराला दिवाळी चा बंप्पर ऑफर
तालुका - प्रतीनीधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - दिनांक.०४/१०/२०२० चिमुर तालूक्यातील जांभुळघाट येथील मुरूम उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराला दिवाळी चा बंप्पर ऑफर सुरू असल्याचे दिसुन येत अाहे.मुरमाच्या उत्खननाला एका ( जेसीबी ) मशीन ची पर्वानगी दिली असताना त्याच्या बरोबर पोकलँड मशीन ला परवानगी दिवाळी बोनस ऑफर म्हणून चिमुर च्या तहसीलदाराने दिला तर नाही ना असावा ? कारण चिमुरच्या तहसिलदाराची बदली झाली आहे पण सध्या चार्ज त्यांच्याकडेच असल्याने जाता-जाता दिवाळी चा ऑपर मुरम उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराला दिला असावा असच यावरून दिसुन येत अाहे.जांभुळघाट येथे मुरमाचे उत्खनन पोकलँड व जेसीबी मशीनच्या द्वारे होत अाहे.या दोन्ही मशीन द्वारे मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहानाची परवानगी घेतली आहे का ? यांची चौकसी होणे गरजेचे अाहे. किती दिवसाची लिज काढण्यात अाली आहे व किती ब्रास लिज देण्यात आली अाहे. कोठून कुठे नेण्याची परवानगी दिली अाहे.लिज संपल्या नंतर त्या जागेवरील उत्खननाची चौकशी होणे गरजेचे आहे.कारण त्या जागेवरील उत्खनन हे किती ब्रास चे घेण्यात आले होते व किती ब्रास उत्खनन करण्यात आली अाहेत.खड्डा किती खोल करण्यात अाला आहे.हे नियमात बसते कि नाही, नियम बाह्य खड्डा करून उत्खनन करण्यात आले अाहे का ? याची सखोल चौकसी उत्खनन झाल्या नंतर तहसिलदाराने किंवा महसुल विभागाने करणे गरजेचे आहे.मांगील दोन वर्षा पासुन उत्खननाचे माफीया राज जांभुळघाट तसेच चिमूर तालुक्यात सुरू अाहे. २०० ब्रास च्या जागी पाचसे ब्रास काढने किंवा कुठे केंद्र सरकारच्या रोडच्या नावावर बिना लिज चे मुरमाचे उत्खनन करणे, तर कधि नियम बाह्म खड्डा खोल करणे,एक मिटर च्या जागी चार ते पाच मिटर खोल खड्डा करने,रोड च्या बाजुला उत्खनन करने,अश्या प्रकारे मांगील दोन वर्षा पासुन चिमुर तालूक्यामध्ये मुरमाचे उत्खनन होत आहे.या सर्व प्रकारची चौकसी होने फार गरजे चे अाहे.अन्यथा शासनाचा महसूल बुडाला असे यावरून सिद्ध होईल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!