नेरी-चिखली (शिरपुर) डांबरी करन रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे

चौकशी करण्याची गावकऱ्यांची मांगणी

तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमूर : -चिमुर तालूक्यातील नेरी-चिखली(शिरपुर) डांबरीकरन रस्त्याचे व पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले.या रोड चे ३ महिन्या अगोदर  डांबरीकरण चे काम करण्यात आले होते.या रस्त्या चे काम इस्टिमेंट नुसार करण्यात आले नसल्याने रस्त्यावर मोट-मोट खड्डे पडले आहेत.डांबरीकरण व पुलाचे काम कंत्राटदाराने योग्य मटेरीयल चा वापर करण्यात न आल्याने रस्त्यावर मोट-मोट खड्डे पडले आहे.
  रस्त्याचे काम  मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंर्तगत करण्यात आले आहेत.कंत्राटतदार मे.ओम.श्री.साईबाबा कंस्ट्रक्शन,भंडारा यांच्या द्वारे रोड चे काम करण्यात अाले आहे.या कामावर जो भष्ट्राचार झाला अाहे त्यांच्यावर वरीष्ट अधिकाऱ्यांनी योग्य चौकसी करून कंत्राटरारावर व अभियंतावर कार्यवाई करण्यात यावी अशी गावकरी समुदया कडून मांगणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!