संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी प्रभाकर सेलोकर यांची निवड

संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी प्रभाकर सेलोकर यांची निवड

ब्रम्हपुरी :( प्रतिनीधी) 
  संजय गांधी निराधार योजना समितीच्या ब्रह्मपुरी तालुकाध्यक्षपदी श्री.प्रभाकर सेलोकर यांची निवड करण्यात आली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शिफारशीवरून  समिती गठित करण्यात आली आहे. 
      महाराष्ट्र शासन,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय क्रमांक: विसयो:-२०१८/प.क्र.६२/विसयो दिनांक:-२० ऑगस्ट २०१९ नुसार मा.मंत्री व इतर मागास बहुजन कल्याण विभाग खार समिती जमिनी विभाग,आपत्ती व्यवस्थापन,मदत पुनर्वसन महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अशासकीय तालुका अध्यक्षपदी  प्रभाकर सेलोकर व इतर सदस्यासह तालुका समितीचे गठन करण्यात आले. 
या संजय गांधी निराधार योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्याधिकारी चंद्रपूर यांचे पत्र क्रमांक १ मधील तरतुदीनुसार अधिकाराचा संजय गांधी निराधार  अनुदान योजनेच्या वापर करावा.
        संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती मध्ये शासकीय/ अशासकिय अध्यक्षपदी प्रभाकर सेलोकर,खेमराज तिडके...        सदस्य,प्रमोद मोटघरे,सदस्य, उमेश धोटे सदस्य,जगदीश तलमले सदस्य,जयाताई कन्नाके ,पौर्णिमा नागदेवते,नानाजी बागडे,तुळशीदास कटलाम,किशोर चौधरी, व इतर शासकीय/अशासकीय यांची निवड पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!