मुल येथील आठवडी बाजारातील गाळ्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट
मुल येथील आठवडी बाजारातील गाळ्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट
मुल येथील आठवडी बाजारातील गाळ्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट व खराब होत असून भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उलगुलान संघटनेच्यावतीने करण्यात आली. मुल येथील आठवडी बाजारात विक्रेत्याच्या व ग्राहकाच्या सोयीसुविधा करिता दुकानाचे गाळे बांधकामाचे काम सुरू आहे. लाखो रुपयाचे बांधकाम असून संबंधित बांधकाम ठेकेदार या ठिकाणी अत्यंत निकृष्ट साहित्य वापरून बांधकाम करत आहे. ज्या ठिकाणी मुरमाचा वापर करायला पाहिजे तिथे मातीमिश्रित रेती टाकून गाळ्यांचा पाया बनवल्या जात आहे. सिमेंटचा अत्यंत कमी वापर होत असून मातीमिश्रित रेती व खराब गिट्टीचा वापर होताना दिसत आहे. सदर बांधकामाची माहिती उलगुलान संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहित होताच त्या ठिकाणी चौकशी केली असता अत्यंत खराब व निकृष्ट बांधकाम बनवताना आढळले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून सदर बांधकामाची तात्काळ चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी करिता उलगुलान संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
जर संबंधित बांधकामाची तात्काळ चौकशी करून बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर उलगुलान संघटना या विरोधात तीव्र आंदोलन करणार वआंदोलना दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास त्याला संबंधित शासन व प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देताना उलगुलान संघटनेचे अध्यक्ष निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, अक्षय दुमावार,वतन चिकाटे, साहील खोब्रागडे तसेच अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!