ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात

मूल 

               जगात कोरोना महामारी चा उद्रेक झाला.त्यामुळे आपल्या देशात लॉकडाऊन चा निर्णय घेतल्याने गाव,शहर व शाळाही बंद करण्यात आल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.खेड्यातील चिमुकले गावातील परिसरात खेळताना दिसत आहेत.मुलांच्या मनातून शिकण्याची लिंक तुटून चालली आहे.भारतातील या सर्वांचे आयुष्य एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून घरापुरते संकुचित झाले आहे.

            कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने लॉकडाऊन सुद्धा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.देशभरातील संपूर्ण शाळा ही बंद करण्यात आल्या आहेत.भारतातील शाळेत शैक्षणिक बदल घडवून परिणामी त्यात डिजिटल शिक्षण देण्याकडे वळली आहे.ऑनलाईन शिक्षणाच्या घेतलेल्या अनियोजित  कारणामुळे, डिजिटल सेवा उपलब्ध नसलेल्या खेड्या गावातील मुलांना शिक्षणाच्या सोई मूलभूत प्रमाणात मिळत नाहीत.ऑनलाईन शिक्षणाचा फायदा हा शहरात वास्तव्यास असलेल्या मुटभर मुलांनाच मिळत आहे.खेड्यातील मुलांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल ची सुविधा नाही.काहीच असे मूल आहेत त्यांच्या कडे मोबाईल आहेत पण त्यांना नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होत नाही.कारण भारतातील फक्त 24%  कुटुंबाकडे स्मार्ट फोन आहेत.5 ते 18 वयोगटातील असलेल्या मुलांना केवळ 11% घरांमध्ये कॉम्प्युटर व इंटरनेट ची सोय निर्माण आहे. व खेड्यातील मुलांना डिजिटल शिक्षणाकरिता स्मार्ट फोन ची योग्य ती सुविधा नाही.

               ऑनलाईन शिक्षनाचे दुर्लक्षित वास्तव असे झाले आहेत की, ऑनलाईन शिक्षणासाठी नावे दिलेले अनेक विद्यार्थी हे नियमित वेळात उपस्थित राहत नाही.त्याचे कारण असे आहे की,इंटरनेट ची अनुपल्धता.75% मुले ही त्याच्या पालकांची किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे मोबाईल वापरत आहेत.अर्थातच आपल्याला असे म्हणता येईल की विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या ठराविक वेळात मोबाईल मिळत नाही.घरात एकच मोबाईल असेल तर त्याचा उपयोग पालक,मोठी भावंडे अशी त्या मोबाईलची विभागणी असते.तसेच जास्त वेळ ऑनलाईन तास चालू असल्याने मोबाईल ची बॅटरी सुद्धा चार्ज करायला वेळ मिळत नाही.असे अनेक कारणे ऑनलाईन शिक्षणामुळे उधभवले आहेत.इंटरनेट ची कॉनेक्टीविटी हे कारण तर मुख्य प्रमाणात उधभवले आहे.ऑनलाईन शिक्षणासाठी वारंवार केलेल्या महिन्याच्या रिचार्ज मुळे कुठुंबात पुन्हा ही मोठी गुंतवणूक तयार झाली आहे. लॉकडाऊन मुळे निर्माण झालेली बेरोजगारी त्यामुळे कुटुंब मोठ्या प्रमाणात कठीनाईने जीवन जगत आहे.आणि त्यात ही पुन्हा एक निविन गुंतवणूक.त्यामुळे कुटुंबात अनेक तणाव निर्माण होत आहेत.तसेच खर्चाचा मुख्य घटक म्हणजे.शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील पाठ्य पुस्तके मिळालेली नाहीत. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले असल्याने विद्यार्थ्यांना नोट्स घ्यावे लागत आहेत, ऑनलाईन पुस्तके खरेदी करावी लागत आहेत.प्रिंट आऊट घ्याव्या लागत आहेत.शिक्षक सुद्धा खर्चिक प्रकल्प देत आहेत.त्यामुळे कुटुंबावर शिक्षणाचा बोजा आधीपेक्षा अधिक वाढलेला आहे.
            नियमित शाळेसह खाजगी शिक्षण घेणे सुद्धा भारतीय शैक्षणिक सुविधेचे वैशिष्ट आहे. घराबाहेर गेल्याने निर्बंध असल्यामुळे अधिक प्रमाणात खाजगी शिक्षण व्हिडीओ किंवा ऑडियो माध्यमातून मोबाईल द्वारे केले जात आहे.त्यामुळे डोळ्यांवरील व तासनतास बोलण्यामुळे कानावर अनेक आजार निर्माण होत आहेत.ऑनलाईन  शिक्षणाचे अध्ययन सुद्धा असे झाले आहे.मोबाईल वर शिक्षण घेतल्यामुळे तासनतास मोबाईल समोर बसून राहावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
डिजिटल शिक्षणाचा प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी शिक्षण मंडळाने या गोष्टी लक्षात न घेता डिजिटल शिक्षणाला मंजुरी दिलेली आहे.वाढत्या कोरोणा प्रादुर्भावामुळे शाळा व कॉलेज चालू करणे शक्य नाही पण त्यात काही नियम लागू करून विद्यार्थ्यांना योग्य ती सोय प्राप्त करून द्यावी.डिजिटल शिक्षणाचे योग्य ते नियम लक्षात घेऊन अनुदानित शाळाबरोबर खाजगी शाळानाही लागू करावे.

अनुराग रवींद्र गोवर्धन
रा. जूनासुर्ला
ता.मुल, जिल्हा.चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!