महिलांनी विविध कल्याणकारी कायद्यांबाबत दाद मागावी - ॲड आम्रपाली लोखंडे
महिलांनी विविध कल्याणकारी कायद्यांबाबत दाद मागावी - ॲड आम्रपाली लोखंडे
सचिन वाकडे, मुल
महिलांनी विविध कल्याणकारी कायद्यांबाबत जागरूक होऊन आपल्या कायदेशीर हक्कांबाबत दाद मागावी असे आवाहन ॲड आम्रपाली लोखंडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने मुल येथील नवभारत विद्यालयाच्या सभागृहात आयोजित महिलांसाठी विधी जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती मुल यांचेमार्फत आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी अनुप ढोरे होते.
पहिल्या सत्रात सदर कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा मुल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष अनुप ढोरे यांनी या कार्यक्रमाचे प्रयोजन सांगून प्रास्ताविकामध्ये सविस्तर कार्यक्रम रूपरेषा स्पष्ट केली आणि महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रशिक्षित मार्गदर्शिका ॲड आम्रपाली लोखंडे यांनी उपस्थित महिलांना राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे महिलांच्या समस्यांबाबत कार्यवाही करण्याचे भूमिका व कार्य सविस्तर नमूद केले. तसेच राज्यघटनेमध्ये नमूद मूलभूत हक्क व त्यांच्या कार्यवाहीबाबतच्या तरतुदी याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. उपस्थित महिलांना कौटुंबिक कायदे, महिलांविषयक लागू पडणारे दिवाणी व फौजदारी कायदे, कामगार कायदेए महिला आरोग्य विषयक कायदे, कस्टडीमधील महिलांबाबत तरतुदी आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सदर कायदेशीर तरतुदींना अनुसरून आपल्या कायदेशीर हक्काबाबत दाद मागण्यासाठीची कार्यपद्धती सोप्या भाषेत समजावून सांगितली. सर्व महिलांना तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेकडून पूर्णपणे मोफत विधी सेवा दिलीजात असल्याचे ठळकपणे नमूद केले. कायदेशीर मदत व माहिती मिळण्यासाठी हेल्पलाइन तसेच वन स्टॉप सेंटर स्वाधार केंद्र यांचीसुद्धा सुविधा उपलब्ध असल्याचे तसेच प्रकरण दाखल पूर्व कौटुंबिक विवाद मध्यस्थी समुपदेशन केंद्र याबाबत सुद्धा माहिती दिली व त्याचे लाभ घेण्याचे आवाहन केले. ॲड डब्ल्यू. डी. महाजन, ॲड प्रणव वैरागडे यांनी महिलांच्या मूलभूत हक्कांबाबत हा कार्यक्रम न्यायव्यवस्थेला घेण्याचे कारण काय या बद्दलचे सविस्तर मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमास तालुक्यातील उमेद ब्लॉक मिशन मॅनेजमेंट युनिटच्या महिलांची मोट्या संख्येने उपस्थिती होती. आर के मुंडरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व
उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता एकनाथ गुंडोजवार, रत्नपारखी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!