सरपंच सेवा संघाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी मनोज चिचघरे
भंंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - दिनांक.२४/१०/२०२० महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली संघटना सरपंच सेवा संघाच्या भंडारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार मनोज चिचघरे यांची संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव भांबोरे यांचे सुचनेनुसार राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील यांनी नियुक्ती केलीआहे . महाराष्ट्रातील सर्व सरपंचाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली राज्यातील पहिली नोंदणीकृत संघटना असून महाराष्ट्रात कार्यरत आहे .मनोज चिचघरे जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात सदैव तत्पर असलेले मनोज चिचघरे यांच्या नियुक्तीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .आपण सदैव सरपंच सेवा संघाच्या उन्नतीसाठी कार्य करू असे नवनियुक्त प्रसिद्धीप्रमुख मनोज चिचघरे यांनी सांगितले. नियुक्तीबद्दल काँग्रेस कमेटीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई ,पवनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे ,मेघराज जोगवे जवान. श्री. होले सुभाष आजबले.बालूभाऊ ठवकर.अभय राऊत.अमोल लाजेवार , शैलेश मयूर ,भगवान नवघरे,छोटू बाळबूधे,लोमेश वैद्य, संपादक प्रदीप घाडगे यांनी कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!