जय अंबे शारदा उत्सव मंडळाचे वतीने रक्तदान शिबिर
वरोरा तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - लाईफ लाइन ब्लड बँक नागपूरच्या सहयोगाने 23 ऑक्टोम्बर ला जय अंबे शारदा उत्सव मंडळांचे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 56 युवक - युवतींनी रक्तदान केले.
लाइफ लाइन ब्लड बँक नागपूर ट्रस्ट चे सहयोगाने वरोरा शहरात जवळपास 18 वर्षांपासून कॅम्प करीत आहे.यापूर्वी नगरपरिषद,रोटरी क्लब,गजानन मंदिर,साई मंदिर,मालवीय वॉर्ड,सुतार समाज,ईद निमित्य मुस्लिम समाज,कटारिया भवन आदि ठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडली आहे.लाइफ लाइन ब्लड बँक चे चंद्रपूर,वणी, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी स्टोरेज असून कोविड क्लाझमा, पेटलेस यांनी रक्त पुरवठा केलेला आहे.
शिबिरात डॉ.रवी भांगे,प्रीती ठाकूर,पायल सागर,हरीश ठाकूर,उत्कर्ष उके,सुशील मेश्राम,धर्मेंद्र कहूरके या डॉक्टर मंडळींनी शिबिरात येणाऱ्या रक्तदात्यांची योग्य तपासणी करून रक्तपेढ्यानमध्ये रक्तसाठा नाही. कोविड कार्यकाळात स्वतःहून जनतेनी समोर यावे रक्तदानाला प्राथमिकता देण्याचे आवाहन लाइफ लाइन ब्लड बँक चे मेडिकल ऑफिसर डॉ.रवी भांगे यांनी केले.
जय अंबे शारदा उत्सव मंडळ गेली 19 वर्षांपासून मंडळ करीत आहे.या कालावधीत मंडळाचे अध्यक्ष आलेख रठ्ठे हे सामाजिक दायित्व जोपासून,समाजकार्याचा वसा घेत,गोरगरीब जनतेसाठी वस्तूंच्या माध्यमातून मदत करीत असतात.दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या महिला,पुरुषांना आर्थिक मदत करून त्यांना दवाखान्यात नेऊन त्यांचेवर संबंधित डॉक्टरांकडून उपचार करवून घेण्यासाठी सहकार्य करणे,आदि कामे सदोदित पार पाडतात. यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष निलेश मोरे,सचिव पियुष गोडबोले, सदस्य शुभम सुराणा,जगदीश वासेकर,बबलू पेंडले,निलेश बन्सोड,यश लोणारे,मनीष नंदनवार,ऋषभ रठ्ठे, अंकित वासेकर आदि सहकारी प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेऊन सहकार्य करतात.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!