समाजोपयोगी नवरंग - आरती चिताडे, फॅशन डिझायनर
समाजोपयोगी नवरंग - आरती चिताडे, फॅशन डिझायनर
अमित राऊत, मुल
संपूर्ण विश्व विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करुन, चंद्रावर वसाहत निर्माण करण्याची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे भारतात महिलांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे, वेळोवेळी प्रकर्षाने दिसून येते. भारतात व्यक्तीस्वातंत्र असले तरी महिलांवर काहि बंधने लादलेली पहावयास मिळते. हि लादलेली बंधने झुगारुन आपापल्या आवडिचा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले रणरागीणींनी समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे युवती तसेच महिला यांच्याविषयी पब्लिक पंचनामामध्ये खास नवरात्र निमित्य विशेष लेखमाला प्रकाशित करण्यात येत आहे.
एकेविसाव्या शतकात मानवाने तंत्रज्ञानात तसेच इतर क्षेत्रात केलेली प्रगती हि वाखानन्याजोगी आहे. तंत्रज्ञान आले, तसे गरजा वाढु लागल्या. या गरजांमध्ये आजच्या तरुणाईला वेड लावणारी फॅशन क्षेत्रहि फोफावत गेले. फॅशन हि केवळ महानगरापुरती मर्यादित आहे असे ठामपणे सांगणाऱ्याना ग्रामीण भागातसुध्दा फॅशनचे वेड आहे, हे समजायला अधिक वेळ लागला नाहि. मुलसारख्या शहरातील आरती चिताडे हि युवती आज आपले छंद जोपासता जोपासता फॅशन डिझायनर म्हणून नावारुपास आली. आजच्या स्पर्धेच्या युगात जिददीने आपले शिक्षण, आप्तेष्टांचा प्रचंड विरोध, मुळ छंदातच आपलं करियर घडविण्याच्या दिशेने तटस्थ भुमिका घेवून आज एक कुशल फॅशन डिझायनर म्हणून तालुक्यात सुपरिचित आहे.9
बालपण हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखद अनुभूती आहे. वयाच्या 6 व्या वर्षीपर्यंत वडिलांनी नियमितपणे खेळायला मउ कपडे घातलेली बाहुली आणून देत असत. पण आरती बालवयात बाहुलीऐवजी वडिलांसोबत खेळण्यात धन्यता मानीत असे, कारण वडिल म्हणजे तीच्यासाठी श्वासाविना देह होता. सर्व काम बाजुला सारत वडिलही आरतीसोबत तीला झोप लागेपर्यंत मनसोक्त खेळायचे. अनपेक्षितपणे एक दिवस वडिलांनी हया जगाचा निरोप घेतला. तो परत पुन्हा कधि न येण्यासाठी.
वडिलांचे छत्र हरविलेली, वडिलांच्या प्रेमाला पोरकि झालेल्या आरतीला एकाकिपणा जाणवू लागला. अश्यावेळी आईने वडिलांनी आणलेली बाहुली तीला खेळायला देत असे. बाहुलीसोबत खेळत ती नकळतपणे बाहुलिचा विश्वात हळुहळु रमायला लागली. जसजसे वय वाढत गेले तसतसे आईच्या चिंतेत भर पडत गेली. कारण, नवनवीन कपडयांच्या छंद लागल्याने आईची नजर चुकवून ती इच्छेनुसार कपडयांना कसेही कापत असे. हा छंद दिवसागणीक वाढत गेला तशी आईचे रागावणं हे स्वाभाविक व कायम होतं.
वय वाढत गेले तसे छंदही वाढले. आता मात्र आरतीत एक वैचारिक बदल झालेला होता. ती या छंदाला आता करियर या दृष्टिने बघु लागली. दृढनिश्चय केलेल्या आरतीचा प्रवास आता छंदापासून प्रोफेशनल फॅशन डिझायनरच्या दिशेने सुरु झाला. यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाची जोड दयावी लागली. पदव्युत्तर शिक्षण घेत असतांना तीला मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला. नातलगांकडून तीच्यावर दबाव टाकण्याच्या भरपुर प्रयत्न केला गेला. पण, त्या दबाबवाला बळी न पडता आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी तडजोड करायला ती तयार नव्हती. नकळतपणे या छंदात आरतीने आपल्या वडिलांना जिवंत ठेवलं होतं.
या क्षेत्रात तीने प्रामाणिकपणे चोख कामगिरी बजावत वयाच्या केवळ 22 व्या वर्षी प्रोफेशनल फॅशन डिझायनर म्हणून बरेच नामांकित पुरस्कार प्राप्त केले आहे. बेस्ट स्टुडेंट सेंट्रल इंडिया इंन्स्टिटयुट ऑफ फॅशन टेक्नोलाॅजी, बेस्ट डिझायनर रनरागिणी फॅशन शो पुणे, बेस्ट थिम व्हि प्रोडक्शन फॅशन शो नागपुर, बेस्ट माॅडेल नागपूर असे विविध पुरस्कार मिळवलेली आरती प्रकाशझोतात आली, ती वृत्तपत्रापासून तयार केलेला ड्रेसमुळे. हा ड्रेस समाजमाध्यमांवर चांगलाच लोकप्रिय झाला होता. आरतीच्या फॅशन डिझायनिंगची दखल देशोन्नतीसारख्या मोठया वृत्तपत्राने घेवून तिच्या वृत्तपत्रापासून बनविलेल्या ड्रेसला स्पेस मिळवून दिली.
फॅशन डिझायनिंग क्षेत्रात आपले स्वत:चे वेगळेपण जपणारे नाव तसेच स्वत:चे अस्तित्व असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. आणी तसे वाटण्यात काहि गैर नाहि. तीने निवडलेला मार्ग मोठा व खडतर असला, तरी त्यावर चालायची मनोमन तयारी केलेल्या आरतीला पब्लिक पंचनामाकडून मनपुर्वक शुभेच्छा ...!





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!