आंबोली गावात पिण्याच्या पाण्यात आढळला नारू

गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : -  येथून जवळच असलेल्या आंबोली गावामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये नारू आढळून आला आहे.यामुळे आंबोली गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे मात्र याकडे ग्राम पंचायत कार्यालय आंबोली चे दुर्लक्ष होत आहे.
  संपूर्ण गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा नळाचे पाणी गावकरी पित असतात अशातच   पिण्याच्या पाण्याच्या नळामध्ये  नारू निघाल्यामुळे गावातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व आंबोली गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. व तरी ग्राम पंचायत कार्यालय आंबोली यांनी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!