चिरहरन (कविता)

चिरहरन (कविता)


  यश कायरकर, सावरगांव
         
काल ओंजड भरून गांवभर भटकलो!
स्नेहभावाने ओंजडीतिल ठेवा वाटला!
परतलो तरीही ओंजड भारलेलीच होती!
वाटू तितका प्रेम परत मिळतो हेही खरंच!
रात्रौ झोपण्याचा प्रयत्न केला,
काल जळणाऱ्या 'लंकाधिपतीचा',
'मिस्किल' करणारा 'दहावा-चेहरा' आठवला!
क्षणाचा विलंब न करता लंकेश मला थेट स्वप्नात येऊन भेटला! म्हणाला.." 'यश' आज गर्दीत तुम्हीही होता?"
अदबीने बोलला पंडित होता तो!
"होय पत्रकार म्हणून महाराज गर्दित मीच कसा दिसलो?"
मी उलट प्रश्न केला!
तो म्हनाला...
"गर्दित वर्षानुवर्षे साऱ्यांनाच बघतो, 
सारेच माझ्यासारखेच दिसतात!
पण राम कुठे दिसतंच नाही !
मी अहंकारी,राक्षस,बहिणीवरील प्रेम, स्वयंवरातील अपमानाने व्यथीत होऊन सीतामातेचं हरणंही केलं.. 
पण मर्यादा जपल्या, स्पर्शही केलं नाहीं!
आणि तुम्ही हररोज,चीरहरण करता त्याच काय.?"
मोठा प्रश्न ठेवून गेला पुन्हा भेटू म्हणून!
सकाळी पोहतांना नदीकाठावरील 'आपट्याला' बघितलं!
रोज वाटसरूंना सावली देणारा ,
आज त्याच्या ओरफडलेल्य नग्न शरीरानं,
मला मी त्याच पात्रात,
डुबुन मरावं इतकं असहाय केलं!
काल परंपरा जपण्यासाठी आम्हीच या आपट्याच्याझाडाचं  चिरहरण केल होतं..
मी शरमेने नदीत पुन्हा डुबकी घेतली, 
रुजलेल्या, कुजलेला,रुढी, परंपरा ची तिरडी वाहणाऱ्या... 
माझ्या आंतर, बाह्य शरीराला पोतलेल अंधश्रद्धेचं चिखल, 
घाण पुसण्यासाठी.,
शेवटची डूबकी घेतली.!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!