दारू माफीया अविनास नवरखेडे ला केली अटक

३ दिवसाची दिली पोलीस कोठडी

बंडू पाटील अजूनही फरारच

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालुक्यात दि.११/१०/२०२० ला दारूबंदी पथक चंद्रपूर पोलीसानी भिसी पोलीस स्टेशन हद्दीत मौजा कपर्ला येथे गाडीसह दारू पकडण्यात अाली होती.चौकसी केली असता दोन व्यक्ती चे नाव सांगण्यात अाले.अविनास नवरखेडे(हिंगणघाट)व बंडू पाटील(मोटेगाव) यांचे नाव सांगण्यात आले.अाज दि.१९/१०/२०२० सकाळी अविनास नवरखेडे ला सिर्सी येथुन भिसी पोलीसा कडून अटक करण्यात अाली.
व त्यांनतर चिमुर न्यायालयात हजर करण्यात आले असता ३ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात अाली.दि.१९/१०/२०२० ते २१/१०/२०२० या तारखे पर्यंत पोलस कोठडी सुनावण्यात अाली.अविनास नवरखेडे हा मागील कित्येक दिवसा पासुन चिमुर तालुक्यात दारु पुरवठा करीत होता.पण स्थानिक पोलीसा कडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नवती.अाखेर चंद्रपूर पोलीस पथका कडून कार्यवाही करण्यात आली.दारू माफीया अविनास नवरखेडे कडून ३ दिवसाच्या पोलीस कोठडी सुनावणी द्बारे बरीशी माहिती पोलीस प्रशासनाला मिळू शकेल.तर दुसरा अारोपी बंडू पाटील(मोठेगाव)याला आता पर्यंत अटक करण्यात अाली नाही. त्याबाबत शोध मोहीम सुरू असून सध्या तो फरार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!