समाजोपयोगी नवरंग - निकिता हजारे

समाजोपयोगी नवरंग - निकिता हजारे

सचिन वाकडे, मुल

               संपूर्ण विश्व विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करुन चंद्रावर वसाहत निर्माण करण्याची तयारी करीत आहे तर दुसरीकडे भारतात महिलांना दुयम वागणूक दिली जात असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून येते. भारतात व्यक्तीस्वातंत्र असले तरी महिलांवर काहि बंधने लादलेली पहावयास मिळते. हि लादलेली बंधने झुगारुन आपापल्या आवडिचा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले रणरागीणींनी समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे युवती तसेच महिला यांच्याविषयी पब्लिक पंचनामामध्ये खास नवरात्र निमित्य विशेष लेखमाला प्रकाशित करण्यात येत आहे. 

               मनात दुर्दम्य इच्छाशक्ती असली, तर सर्व ध्येय सहज गाठता येतात. पण त्यासाठी अपार मेहनत घ्यायची, मनाशी खुणगाठ बांधणे आवश्यक आहे. मुलसारख्या शहरातील युवती आज दाक्षिणात्य प्रसिद्ध टाॅलीवुडसारख्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुणीही गाॅडफाॅदर नसतांना, केवळ मेहनत व कौशल्याचा बळावर आपल्या कामाशी प्रामाणिक राहुन, आपले पाय घट्ट रोवू पाहतेय.
               मुल येथील मध्यमवर्गीय परिवारात कु. निकिता हजारे हया गुणी युवतीचा जन्म झाला. आज नृत्यक्षेत्रात ती टाॅलीवुडमध्ये काम करत असली, तरी तीला सुरुवातीला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने निकिताला इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मामाकडे राहून पुर्ण करावे लागले. या काळात वडीलांना लकवा झाल्याने पुढिल शिक्षणासाठी मुलला यावे लागले. अगदी शैक्षणिक वयात घरातील परिस्थितीची जाणीव होऊन निकीताने स्वत:चा खर्च स्वत: करण्याचा ठरवून घरी आपल्याकडून थोडीफार आर्थिक मदत व्हावी, म्हणून निकिताने एमएससी-आयटी शिकविण्याकरीता काॅम्पुटर इस्टिटयुटमध्ये शिकवणी घेण्यास सुरवात केली. यामुळे निकीता स्वत: स्वावलंबी तर झालीच परंतु घरी सुध्दा आर्थिक मदत झाली. इतरांकडून उसनवारीने पैसे मागण्यापेक्षा स्वाभीमानी युवती असल्याने मेहनत करुन प्रपंच चालविण्यावर भर दिला. कृषी पदविका घेतलेल्या निकिताला परिस्थितीशी दोन हात करीत ग्रामपंचायत, अंबुजा सिमेंट फाउंडेशनमध्ये तात्पुरती नोकरी मिळाली. गडचांदूरला मुक्कामी राहणे शक्य नसल्याने अंबुजा सिमेंट फाउंडेशनची नोकरी सोडली. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखेच निकितानेही शासकिय नोकरी करीता अनेक प्रयत्न केले, पण वेगवेगळ्या कारणास्तव ते प्रयत्न अपुर्ण राहीले.
               पुढे नागपुरला एमपीएससी वर्गासाठी गेल्यावर तीथे महिण्याकाठी येणारा खर्च निघावा, म्हणून महिंद्रामध्ये पुन्हा तात्पुरती नोकरी केली. पण महानगर नागपुरला भाडयाच्या खोलीत राहत असतांना शिक्षणासाठी पुर्ण वेळ देता येत नव्हते, तसेच वाढत्या महागाईमुळे तीथे राहणेसुध्दा शक्य नव्हते. नागपुरातील वास्तव्यादरम्यान विशेष आठवणीतील कधिही न विसरता येणारी घटना म्हणजे, आर्थिक चणचणीमुळे अन्नाविना उपाशी राहून काढलेले ते दोन दिवस, आयुष्यात खुप काहि शिकवून गेले. आयुष्य हे चढ उतारांनी भरलेले असून आलेल्या समस्यांवर वेळोवेळी मात करण्याखेरीज दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता.
               समोर असलेले सर्व मार्ग बंद झाल्याने मुलला परत येणे झाले. मित्रांकडून उसनवारीने पैसे घेवून आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, म्हणून आपल्या छंदाला व्यावसायीकतेत रुपांतरीत करणे क्रमप्राप्त होते. तेच निकिताने केले. तत्कालीन सखी मंच, शालेय - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नृत्य शिकवित गेली. जन्मजात प्रत्येकांमध्ये काहिनाकाहि कलागुण असतात. फक्त ते काहिंचे स्वतापुरते तर काहिंचे सार्वजनिक असतात. निकिताला नृत्यकलेत आवड असली तरी तीच्या या आवडीला घरच्यांच्या कडाडून विरोध होता. जरी नृत्यकलेसाठी परवानगी दिली तर नृत्यामुळे आर्थिक प्रगती कशी साधणार? हा घरच्यांच्या सवाल असे.
               दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने, टेलिव्हिजन पाहत नृत्यकलेत आज पारंगत झालेल्या निकिताने युवा मंचचा माध्यमातून नृत्यस्पर्धेत भाग घेत राहिली. आणी, हळुहळू पारितोषिकांची रिघ लागली. त्यातुन निकिता राज्यस्तरीय नृत्यस्पर्धेतही गेली. स्वत:चा एक प्लॅटफार्म तयार झाल्यावर ती इतरांनाही नृत्य शिकवू लागली. यातून आर्थिक उन्नती साधता आली. निकिताला इथेच थांबायचे नव्हते, तर प्रगतीच्या वाटेवर पुन्हा लांबचा पल्ला गाठायचा असल्याने, ती थेट हैदराबाद गाठत दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री टाॅलीवुडमध्ये नशिब आजमायला गेली. दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये कुणी गाॅडफाॅदर नसल्याने संघर्ष करण्यात काहि कालावधी गेला. आपल्या नुत्याच्या बळावर तीला टाॅलीवुडमध्ये बॅकग्राउंड डाॅन्सर म्हणून संधी मिळाली. छान डाॅन्स करित असल्याने तीला एकापाठोपाठ एक असे अनेकदा संधी मिळत गेल्या.
               शुटिंग, इव्हेंट, ऑडिओ लाॅंच यात मिळेल ते काम करित निकिता यशाची पायरी चढत गेली. यामुळे आर्थिक संकटे दुर झाली. आज ती टाॅलीवुडमध्ये काम करित असुनहि घरच्या कामांमध्ये तिचा सहभाग असतो. भाऊ अक्षय याला परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी तिचा महत्वाचा पाठींबा आहे. इव्हेंटसाठी तीला दुबई, सिंगापूरला जाण्याची संधीसुध्दा मिळाली आहे. स्वत:ची आवड जोपासत ती आता अभिनयाकडे वळली आहे. 7 वेबसिरीजमध्ये काम केलेल्या निकिताला पुन्हा लांबचा पल्ला गाठायचा आहे. तीला टिव्ही मालिकांमध्ये काम करायचे असल्याचे ती आवर्जुन सांगते. त्या दिशेने निकिताचे प्रयत्न सुरु आहेत आणि घर सांभाळून स्वत:ची स्वप्नही पुर्ण करू हा विश्वास देखील आहे.
               आकाशाला गवसणी घालणाऱ्या निकिताच्या मते, नुसतं जगणं महत्वाचं नाहि, तर त्या जगण्याला उद्देश हवा, स्वप्ने असावीत. बाहेरच्या जगामध्ये आपली स्वत:ची ओळख आणि स्वत:चं वेगळं अस्तित्व असायला हवं, असं निकिता आवर्जुन सांगते.
               नृत्यकला क्षेत्रात आपले स्वत:चे वेगळेपण जपणारे नाव तसेच स्वत:चे अस्तित्व असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. आणी तसे वाटण्यात काहि गैर नाहि. तीने निवडलेला मार्ग मोठा व खडतर असला, तरी त्यावर चालायची मनोमन तयारी केलेल्या निकिताला पब्लिक पंचनामाकडून मनपुर्वक शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!