बिरसा मुंडा कृषीक्रांती योजनेचा लाभ घ्या
मूल :( कुमुदनी)
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना अनूसूचित जमातीच्या शेतक—यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेव्दारे वैयक्तिक लाभाच्या योजना 15 आॅक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात आले असून या योजनेचा जास्तीत जास्त शेतक—यांनी लाभ घेण्याचे आवाहन आपले सरकार सेवा केंन्द्राचे संचालक व सामाजिक कार्यकर्ता प्रमोद मशाखेत्री यानी केले आहे. मूल तालुक्यातील पात्र लाभाथ्र्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अनुसूचित जाती,जमातीच्या प्रवर्गातील शेतक—यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कृषीविभागाव्दारे ही योजना सुरू करण्यात आलेल्या बिरसा मुंडा कृषीक्राती योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थी शेतक—यांना खालील कागदपत्रे व अर्टीची पुर्तता करावी लागणार आहे. त्यामध्ये लाभार्थी हा अनुसूचित कोरडवाहू लाभार्थी,अनुसुचित जाती,जमाती,आदिवासी शेतकरी असावा,जातीचा प्रमाणपत्र ,लाभाथ्र्याकडे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6.0 हेक्टर ऐवढी शेतजमीन असावी. वार्षिक उत्पनाचा प्रमाणपत्र ,शेतजमीन असावी,विशेष घटक योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा, दारीद्र रेषेखालील वनपटेधारक शेतकरी व महीला शेतक—यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत नवीन विहीर बांधकाम,इनवेल बोरवेल, विज जोडणी आकार,पंप संच,ठिंबक सिंचन,पिव्हिसी पाईप,परसबाग,इत्यादी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक—यांनी आॅनलाईन प्रणालीवर 14 नोव्हेबर 2020 पर्यं अर्ज सादर करून आॅनलाईन झालेल्या अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे कृषि अधिकारी यांच्याकडे निर्धारित वेळेत सादर करणे आवश्यक आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!