संजय मुत्यारपवार ते सौदागर लाकूड कटाई आरामशिन पर्यंत तात्काळ रोड करण्यात यावा
मूल :(कुमुदिनी भोयर)
मुल येथील वीर सावरकर वार्ड नंबर 12 हिरालाल भडके यांच्या घरापासून सौदागर लाकूड कटाई आरा मशीन पर्यंतचे रोडची पाहणी उलगुलान संघटना द्वारे केली असता यामध्ये अत्यंत खड्डे व खराब रोड असल्याचे समजताच उलगुलान संघटनाचे कार्यकर्ता तसेच पदाधिकारी यांनी रोडचे चित्रीकरण व व्हिडीओ काढून प्रशासनाला निवेदन द्वारे कळविण्यात आलेले आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी
जर संबंधित रस्त्याची तात्काळ चौकशी करून लवकरात लवकर रोडचे काम चालू करण्यात यावे नाही तर उलगुलान संघटना आक्रमक पवित्रा घेणार असा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला. निवेदन देतांना उलगुलान संघटनेचे मुल शाखा अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, प्रतीक खोब्रागडे, वतन चिकाटे, अश्विन खोब्रागडे, सौरभ नरुले तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!