घराच्या पट्टयासाठी आम आदमी पार्टीची मागणी

घराच्या पट्टयासाठी आम आदमी पार्टीची मागणी 

सावली : (दिनेश घाटे) 
दि.14/10/2020 ला आम आदमी पार्टीच्या राज्य सदस्या मा. परोमिताताई गोस्वामी,कार्यकर्ते,वार्ड नं.2,3,4,17(तिनकवाडी)सर्व महिला साय. 4:00 वाजता यांनी स्व: मालकी हक्काचे पटटे मिळावे या संदर्भात नगर पंचायत सावली,येथे भेट दिली. आम आदमी पार्टी तर्फे गत 2 वर्षा पासून वारंवार मा.पारोमीताताई यांनी नगर पंचायत सावली,येथे प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन दिले होते. तरी याची शहाणीशा करण्यासाठी मा.शाशकिय अधिकारी (न.प.सावली ) मेश्राम साहेब यांचेशि चर्चा केली, त्यावर न.प.सावली व शासनाकडून आलेल्या सर्व पत्रकांची महीती दिली.31डीसे.2019ला न.प.ला आलेल्या महाराष्ट्र शासनाकडून सरळ मोजनि व आवास योजनेंतर्गत वस्त्यांच्या निर्मितीचे आदेश,घर पट्टे धारकांना 500sq फुट पर्यंत मोफत व 500sq च्या वर जागेचे योग्य दर ठरवुन फक्त 10%रक्कम घेण्याचे आदेश शासनाने दिलेले असून त्या जागेची अजुनपर्यंत मोजणी(सर्वे) होत नाही तर काय ?       मा.शासकिय अधिकारी (न.प.सावली) मेश्राम साहेब यांनी फोनवर प्रत्यक्ष जिल्हा अधिक्षक भुमिलेख साहेब यांचेशि चर्चा करुन या कमविषयिचा पाठपुरावा केला.यावरुन त्यांनी असे सांगितले की या कामाकडे बारकाईने लक्ष देऊन काम पुर्ण करण्यात येईल.           जवळपास 30ते40 वर्ष होऊन वास्तवात रहना-या वार्ड नं. 2,3,4 व 17(तिनकवाडी)या वा र्डधारकांना स्व: मालकी हक्काचे पट्टे देऊन त्यांना शासकिय सर्व योजनांचा लाभ मिळवा व ते कोणत्याही शासकिय योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी सावली न. प.,प्रशासन यांनी बारकाईने लक्ष देऊन हे काम मार्गी लावावे .         अशी आम आदमी पार्टी वतीने निवेदन देण्यात आले असून,                        यावेळी उपस्थित आम आदमी पार्टीच्या राज्य सदस्या मा.पारोमीताताई गोस्वामी,मा.राजूभाऊ सोनुले ,मा. गिरिजाशंकर दुधे,मा.रंजिताताई नायडू,मा.वनिताताई गेडाम,मा.कुंदाताई गेडाम,अल्काताई दिग्गलवार,अल्काताई गेडाम,विठाबाई राउत,विद्याताई राऊत,ललीताताई वनकर,मंदाताई रंगारी,अर्चना गद्दे कार,व वार्डातिल सर्व महिला मंडळी तसेच आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.🌹👍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!