जंगली डुकराच्या हल्ल्यात गुराखी ठार

वरोरा तालुक्यातील घटना

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - वरोरा येथून जवळच असलेल्या बेम्बळा येथे आज जंगली डुकरच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना उघड़किस आली असून मृतक शत्रुघ्न  धर्माजी  गेडाम  वय ५४ वर्ष रा बेम्बळा असे मृतक गुरख्याचे नाव असून या घटनेने  गावातील तसेच परिसरातील जनतेमधे भितिचे वातावरण निर्माण झाले आहे.
       सविस्तर असे की मृतक  शत्रुघ्न गेडाम हा गेल्या अनेक दिवसा पासून  गुरे डोरे , शेळी चारण्याचे काम करुण आपल्या कुटुंबचा उदरनिर्वाह करित होता  विशेष म्हणजे बेबळा गांव हे रामदेगी जंगल लगत असल्याने नेहमी प्रमाणे गुरे डोरे चारण्या करिता जंगल लगत गेला होता  परंतु काल दि.१४ रोज बुधवार ला सायंकाल होऊन त्यांचे जनावरे गावात परतले होते परंतु   मृतक सायंकालचे ७ वाजले तरी देखील शत्रुघ्न घरी परतला नसल्याने कुटुंबात भीति निर्माण झाली व त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु रात्रो यांचा काहीच पत्ता लागला नाही व आज  दि. १५ ला सकाळ च्या सुमारास याचा मृतदेह  झुडपा आड़ मिडल्याने गावात घड़बळ उडाली तेव्हा घटनेची माहिती वन विभाग तसेच स्थानिक पोलिस स्टेशन शेगाव येथे देण्यात आली तेव्हा घटनेची माहिती मिडताच  वन विभाग व पोलिस पथक घटना स्थळी पोहचुन सर्व कर्मच्यार्यनी तपास केला असता  जंगली डुकरच्या हल्ल्यात याचा मृत्यु झाला असल्याचे सांगण्यात आले.
         तेव्हा गांव वासीयनच्या  भावना दुखावल्याने  मृत व्यक्तिनच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी असा जनआक्रोश गावकरयांनी केला तेव्हा  मागणीची दाखल घेऊन अन्त्य विधि करिता २५ हजार रोख रक्कम देण्याचे आश्वासन देऊन उत्तरनिय तपसनीच्या  रिपोर्ट वरुण बाकी रक्कम देऊ असे आश्वासन  वनविभाग ने दिले तेव्हा सदर  मृतदेह उत्तरनिय तपासणी करित उपजिला रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आला.
   पुढील तपास वनविभाग कर्मचारी  कोअर क्षेत्त्राचे RFO चव्हाण,बफर क्षेत्र चे धानकुटे, शेख , चौधरी  इत्यादि कर्मचारी सह  पोलिस स्टेशन शेगाव चे ठानेदार सुधीर बोरकुटे पुढील तपास करित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!