एम.एस.ई.बी.च्या भोंगळ कारभारामुळे विद्युत शॉक लागून शेतकरी ठार
एम.एस. ई. बी.च्या दुर्लक्षित कारभारामुळे घडला हा संपूर्ण प्रकार
राजुरा तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - विरुर स्टे चिंचोली बु. येथील शेतकरी मारोती देऊ लोहट वय ६२ वर्षे यांचा स्वतःच्या शेतात MSEB च्या भोंगळ कारभारामुळे विद्युत शॉक लागून एका शेतकऱ्याचे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन येथाशीघ्र योग्य ती भरपाई वीज वितरण विभागाकडून त्यांच्या कुटुंबाला देण्यात यावी. अशी मागणी गावकऱ्यांकडून होय असून राजुरा तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. याकडे MSEB चे दुर्लक्ष होत आहे. मृतक हे कुटुंब प्रमुख होते त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह त्यांचावर अवलंबून होता. परंतु अखेरचा श्वास घेण्यास विद्युत विभागाने भाग पाडले. वारंवार विद्युत तारेचा करंट भासत असतांना सूचना देऊन विद्युत मंडळाचे दुर्लक्ष होत होते. या घटनेचा संपुर्ण गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे आणि शासनाने ताबडतोब विद्युत दुरुस्ती करावी आणि मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी वारंवार गावकऱ्यांची सुरु असून मृतकाच्या परिवारात ३ मुले व १ पत्नी असा आप्त परिवार आहे. मृतकाच्या परिवाराला ५० लाख रूपेय आर्थिक मदत करावी अशी सुद्धा चिंचोलि (बु) येथील स्थानिकांची मागणी आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!