भाद्रवतीच्या डिफेंस कॉलोनी मध्ये भर दिवसा एका पट्टेदार वाघाचे दर्शन

भाद्रवतीच्या डिफेंस कॉलोनी मध्ये भर दिवसा एका पट्टेदार वाघाचे दर्शन

चंद्रपुर : (मोहम्मद सुलेमान बेग) 

भद्रावती येथील डिफेन्स कॉलोनीच्या (संरक्षण) वसाहतीत दिनांक 13 ऑक्टोबर रोजी वाघाच्या दर्शनामुळे त्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
प्राप्त माहितीनुसार या वसाहतीच्या सेक्टर पाच मधील केंद्रीय विद्यालयाच्या जवळ सागवानांचे जंगल आहे. त्या जंगलात एका पट्टेदार वाघ फिरताना दिसत आहे . याची माहिती लोकांना होतांच त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरा मध्ये वाघाला कैद केले. शहरा लगत हा परिसर असल्याने येथे नेहमीच नागरिकांची चळवळ असते. 
जवळच ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे या भागात बरेचदा वन्यजीव बघायला मिळतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!