गोसे प्रकल्पातील वाढीव कुटूंबांना मिळणार २.९० लाखाचे पॅकेज
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झाली बैठक
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - गोसे धरण प्रकल्प ग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आज विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. जलसंपदामंत्री जयंत पाटील,आमदार नरेंद्र भोंडेकर,जलसंपदा विभागाचे सचिव मित्तल व चंद्रा,संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.गोसे प्रकल्पाअंतर्गत अंशतःबाधित ३८ गावांचे पुनर्वसन,भंडारा व नागपूर जिल्ह्यतील ८००० कुटूंबांना २.९० लक्ष रुपयांचे सरसकट पॅकेज देण्यात यावे आदी विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!