वाघाच्या हल्यात इसम ठार
ब्रम्हपुरी :(सुरज सुर्यवंशी)
तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार झाल्याची घटना घडली आहे.
मृतक इसमाचे नाव उमाजी कुशन मस्के वय वर्षे ७० असे असून हळदा गावातील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार काल दिनांक दिनांक:-१४/१०/२०२० ला सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास मृतक इसम उमाजी हा गावालगतच असलेल्या जंगलात शेळी चारण्यासाठी गेला असता संपूर्ण दिवस लोटून उमाजी हा शेळी चारून घरी परतला नसल्याने त्याचा शोध गावतील काही लोकांनी केला.मात्र रात्र निघून गेली तरीही उमाजीचा थांगपत्ता लागला नाही.तीच शोध मोहीम आज दिनांक:-१५/१०/२० सकाळी ७:०० वाजतापासून सुरुवात केली असता उमाजीच मृत शरीर अस्थाव्यस्थ रुपात मिळाले असता उमाजी नरडीचा घोट वाघाने घेतला असल्याचे निष्पन्न झाले.कारण उमाजीच्या शरीरावर वाघाचे निशाण असल्याने उमाजीचा जीव हा वाघानेच घेतला आहे.
दक्षिण परीक्षेत्र हा जंगलव्याप्त असून वाघाच्या हल्यात ठार झाल्याची महीना भरातील दुसरी घटना आहे.
मृतक उमाजी हा कुटूंबात एकटाच राहत असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी शेळीपालन करून कसाबसा पोट भरायचा. मात्र नियतीला ते पण मंजूर नव्हते व नरभक्षक वाघाने हल्ला चढवून उमाजीचा जीव घेतला.
उमाजीच्या जाण्याने गाव परिसर शोकासागरात बुडाला आहे.
तरी संबंधित वाघाचे हल्ले बघता वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा.अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हळदा व सभोवतालील ग्रामवासींयांनी दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!