चिमुर - कांपा जाणाऱ्या राज्य मार्गा वरील मालेवाडा गावालगत असलेल्या डांबर प्लॅन्टचे कंपाऊंड हे सरकारी जागेवर - शिवसेना उप तालूका प्रमख केवलसिंग जुनी चिमुर


सार्वजनिक बांधकाम उप विभागाला शिवसेना तर्फे देण्यात आले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - चिमुर तालूक्यातील चिमुर - कांपा राज्य मार्गावरील मालेवाडा गावालगत डांबर प्लॅन्टचे तारेचे कंपाऊंड सरकारी जागेवर केलेले असल्यामुळे या अतिक्रमण बाबत चौकशी करून कायदेशीर हटविण्यात यावी.
हा कंपाऊंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर असून बांधकाम करण्यात आले आहे.त्यामुळे येणाऱ्या - जाणाऱ्या वाहणाला त्रास सहन करावा लागत अाहे.डांबर प्लॅन्टचे वाहन हे रोड वर उभे असतात. त्या जागेवर उमा नदीचा पुल व मोड असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
सार्वजनिक बांधकाम विभागानी मौका चौकशी करून कायदेशीर अतीक्रम हटवीण्यात यावे.याकरीता शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उप विभाग चिमूर येथे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना शिवसेना उपतालूका प्रमुख केवलसिंग जुनी,विभाग प्रमुख डॉ.कृष्णकुमार टोंगे, केशव नंन्नावरे,शाखा प्रमुख तुकडू ठाकरे व इत्यादी शिवसैनीक उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!