आम आदमी पार्टी व श्रमीक एल्गार चे धरणे आंदोलन !

आम आदमी पार्टी व श्रमीक एल्गार चे धरणे आंदोलन !


         आम आदमी पार्टी शाखा राजुरा च्या वतीने आज नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करणे किंवा ठार मारणे,वाघाच्या ‌हल्लात जखमी व मृत पावलेल्या व्यक्तींना उचित आर्थिक लाभ मिळवून देणे. पिडीत कुटुंबातील एकाला नोकरी मिळवून देणे.वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देणे. तसेच 
 राजुरा येथील निराधार महिला सुमन सोयाम हीला न्याय मिळवून देण्यासाठी एक दिवसीय धरणे  आंदोलन तहसिल कार्यालय, राजुरा समोर करण्यात आले.
            यावेळी संजय गांधी निराधार योजने अंतर्गत फार्मवर नगर परिषद राजुरा येथील अधिक्षक जांभुळकर यांची सही घेण्यासाठी सुमन वसंता सोयाम या स्वत: गेल्या असता  तिचे अर्वाच्य भाषेत स्वागत करून जास्त बोलल्यास पोलिसांना ते बोलविण्याची धमकी दिल्या गेली.यामुळे ती महीला भयभीत होऊन तिने श्रमीक एल्गार च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आज नगर परिषद राजुरा वर हल्ला बोल करून याचा जाब राजु-याचे नगराध्यक्ष अरूणभाऊ धोटे यांना विचारण्यात आला.त्यांनी नगर परिषद अधिक्षक जांभुळकर यांना मोर्च्यासमोर बोलवून पिडीता सुमन सोयाम हीची माफी मागायला भाग पाडले.तसेच तिच्या कागदपत्रावर अधिक्षकांची सही घेऊन तिला कागदपत्रे सादर केलीत.
              आप चे जिल्हा संयोजक सुनिल मुसळे यांनी वन अधिकारी गलगट साहेब यांचेशी चर्चा करून त्यांना आतापर्यंत वाघाच्या बंदोबस्त संबंधाने आपण काय पाठपुरावा केला याची माहिती मागितली.ती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तसेच वाघाला जेरबंद करण्याचे आणि मारण्याचे अधिकार आम्हांला नाहीत असे सांगितले.यासाठीची समिती याबाबत योग्य ती कारवाई करेल असे सांगितले.यामुळे आंदोलकांचे समाधान झाले नाही.त्यांनी याबाबत पाठपुरावा करून तात्काळ वाघाला जेरबंद करावे याचा आग्रह धरला.त्यांनी नेहमीच्या सुरात आमचे प्रयत्न सुरू आहेत असे उत्तर दिले.आम आदमी चे पदाधिकारी याबाबत जिल्हा पातळीवर याचा आता पाठपुरावा करणार आहेत.
           या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी आम आदमी पार्टी राजुरा चे संयोजक रोशन येवले, श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम, संतोष तोगर, सुरेश लोखंडे,पवन ताकसांडे, सुभाष बोरकुटे,स्वप्निल कोहपरे, तुळशिराम किन्नाके यांचे सहकार्य लाभले.
            आप'चे जिल्हा संयोजक सुनिल मुसळे, जिल्हा संघटन मंत्री परमजीतसींग झगडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जेष्ठ सदस्य मिलिंद गड्डमवार तसेच श्रमीक एल्गार चे संतोष कुळमेथे,दीपक मडावी,अभिलाष परचाके,सुमन सोयाम,गंगा टेकाम,भविका मेश्राम,शैलजा टेकाम,शितल सिडाम,उषा लोखंडे,प्रतिभा मत्ते यासह शेकडो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!