जागतिक गोंड सगा मांदि तालुका शाखा चिमूर तर्फे राजा रावण गोंगो (पुजा) संपन्न

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : -  दिनांक.२५/१०/२०२० ला जागतिक गोंड सगा मांदि तालुका शाखा चिमूर च्या वतीने गोंड मोहल्ला चिमूर आणि जागतिक गोंड सगा मांदि शाखा नवेगाव (पेठ ) येथे गोंड राजा सम्राट रावेन उर्फ रावण मडावी पुलत्स्य वंशीय दहा राव राहुड यांची संयुक्त रित्या पुण्यतिथी/ शहादत दिवसावर श्रद्धांजली व सेवा अर्जी करुन समस्त गोंड गोंडीयन , कोयतुरांनी    सुमरण व गोंडी पाटा गाऊन राजा रावणाची स्तुती सुमने व त्यांची आठवण करुन आदरांजली अर्पण केली .
                   राजा रावणाची पुजा करण्या मागचा उद्देश म्हणजे कोयतुर गोंड लोक रावणाला आपला पुर्वज मानतात व स्वताला रावण वंशाचे समजतात. या मागणे कारण म्हणजे राजा रावण स्वता गोंड जमातीचा असुन वैज्ञानिक दृष्टया व गोंडाच्या पारंपरिकतेवरून असे लक्षात येते की जंगल आणि ताडाचे झाड याचा संदर्भ देतांना मनोजसिंह गोंड मडावी यांनी असे सांगितले की रा म्हणजे ताडाच झाड आणि वन म्हणजे जंगल असे विग्रह करून सांगितले.
रा+ व + न = राऊजेनोर वरेंदु नरेंदर म्हणजे राजा असा अर्थ होतो. याही पलिकडे जाऊन सांगताना रावेन हा पक्षी असून मडावी गोत्राचा पुज्यनीय पक्षी आहे.‌ यालाच रावेन पक्षी असे म्हणतात.आणि याच पक्षाच्या नावावरून रावण असे नांव देण्यांत आलें आणि रा म्हणजे राजा आणि वेन  म्हणजे माणूस .
म्हणजेच राजामाणूस  असा अर्थबोध निघतो. .या वरून एकंदरीत रावण हा गोंड आहे व पुज्य आहे.  
                बैतूल , बस्तर , मंडला व महाराष्ट्रात सुध्दा राजा रावणाची पुजा हजारो वर्षांपासून पिढ्यान् पिढ्या गोंड समाजाची प्रथा सुरू आहे. करीता रावण दहनाचा विरोध करून दसॖ॒-याच्या दिवशी पुजा करून रावणाचा जयजयकार करतात .
याचीच प्रचिती म्हणून चिमूर तालुक्यात व चिमूर शहरात गेल्या पाच वर्षांपासून जागतिक गोंड सगा मांदि व गोंड समाज ‌रावण दहनाचा विरोध करून दसॖ॒-याच्या दिवशी पुजा करतात.
                           या कार्यक्रमाला उपस्थित गोंड समाजातील जागतिक गोंड सगा मांदि चे मुर्सेनाल मनोजसिंह गोंड मडावी यांनी मार्गदर्शन केले.कोविड 19 चा विचार करता शासनाने निर्देशित केलेले नियम व अटी सहीत सोशल डिस्टन्सींग ठेवून कार्यक्रम पार पाडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व तिरू. दिलीपसिंह गोंड वटे ,दिपक गोंड कुमरे , लक्ष्मण मडावी ,  मोतिराम मडावी , संजय मसराम , सुधिर मसराम , डॉ. गजानन मडावी ,नरेश कुळमेथे , दिलीप मडावी , रामदास सोयाम ,  अमोल मसराम , प्रदिप कुमरे , बलवंत मडावी ,चेतन मसराम ,बंटी मडावी , किसन मडावी , शंकर मडावी, विनोद कुसनाके ,तात्याजी कुसनाके , संजय करपाते , तसेच मातॄशक्ती सर्व तिरूमाया स्मिता म. मडावी, कुंदा दि .वटे , कविता सु. मसराम , माधुरी स. वरखडे , जिजाबाई दि.मडावी , वंदना न .कुळमेथे , किरण स.मसराम , आशा मो. मडावी , सुनिता उईके , मंगला म.मडावी , शशिकला ना.मडावी ,लक्ष्मीबाई दा.वरखडे , तसेच लया  ,लयोर यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!