पावसाच्या विश्रांती नंतर धान कापणीला आला वेग
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगांव (पि) : - मागील आठवड्यात दर दिवशी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना हैराण करून सोडले होते.अनेक शेतकऱ्यांची धान पीक जमिनदोस्त होऊन जमिनीवर लोळले.आता काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतल्याने धान कापणीला वेग आला असून मजूर वर्ग शेतामध्ये धान कापताना दिसून येत आहेत.काही शेतकर्यांनी मजूर टचाईचा सुद्धा सामना करावा लागत आहे.काही गावातील मजूर बाहेर ठिकाणी सोयाबीन ,कापूस काढणी साठी बाहेर गेले आहेत,काही चार चाकी ने गाडीने रोज जात आहेत.या मुळे शेतकऱ्यांना धान कापणाऱ्या मजुरांची वाट पाहावी लागत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!