चिमुरात पिण्याचा पाणी पुरवठा गढूळ , जनतेचे आरोग्य धोक्यात
न.प.बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - चिमूर नगर परिषद अंतर्गत जनतेला पाणी पुरवठा नळाच्या माध्यमातून होत असताना मागील पाच दिवसापासून प्रभाग क्रमांक ६ , १२ ,१३ मध्ये नळांना गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे तेव्हा प्रत्यक्ष नप बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी घरोघरी जाऊन चौकशी केली असून प्रशासन व पाणी पुरवठा समिती चे दुर्लक्षच असल्याचा आरोप करीत तात्काळ नप प्रशासनाने पाईप मधील दोष काढून पूर्वरत शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नप बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी केली आहे
चिमूर नगर परिषद च्या प्रभाग क्रमांक ६,१२,१३ मध्ये जनतेला नळ पाणी पुरवठा च्या माध्यमातून पुरवठा सुरू आहे परंतु मागील ५ दिवसापासून नळाचे पाणी गढूळ येत आहे त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर प्रभागात नप बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी प्रत्यक्ष सकाळच्या दरम्यान नळ धारकांच्या घरी जाऊन चौकशी केली असता गढूळ पाणी येत असल्याचे आढळले मागील ५ दिवसापासून येत असताना नप प्रशासन मात्र सुस्त दिसत आहे पाईप लाईन ला कोणत्या तरी नप शौचालय च्या जोडले असावे असा दाट संशय असून गढूळ पाणी कोठून येते याची तात्काळ चौकशी करून शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी करीत अन्यथा जनतेच्या आरोग्यास धोका झाल्यास नप जबाबदार राहणार असल्याचा सुद्धा नप सभापती अब्दुल कदिर शेख यांनी इशारा दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!