दारू विक्रेत्यावर ब्रम्हपुरी पोलिसांची कारवाई

दारू विक्रेत्यावर ब्रम्हपुरी पोलिसांची कारवाई


 ब्रम्हपुरी:  दि. 14 ऑक्टोबरला ब्रम्हपुरी पोलिसांना   कुर्झा चौकाजवळ वडसा रोड ब्रम्हपुरी येथे  देवेंद्र पंढरी रंगारी हा आपले घरासमोर चारचाकी वाहनात अवैधरित्या देशी दारु ठेवुन विक्री करीत आहे. अशी खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली त्यावरून  पोउपनि अख्तर सय्यद, पोकॉ, संदेश देवगडे पोकॉ, नितीन भगत  यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कार दिसून आली तिची झडती घेतली असता कार मध्ये 12 पेट्या देशी दारूच्या मिळून आल्याने आरोपीस ताब्यात घेतले  12 दारूच्या पेट्या व कार   असा एकुण 3,15,200/- रु.किमतीचा चा माल जप्त केला असून पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!