बी.एड.प्रकरण संबंधाने विभागीय आयुक्त स्तरावर स्वतंत्र चौकशी समिती गठीत करण्याची शिक्षक परिषद प्राथमिक ची मागणी.

बी.एड.प्रकरण संबंधाने विभागीय आयुक्त स्तरावर स्वतंत्र चौकशी समिती गठीत करण्याची शिक्षक परिषद प्राथमिक ची मागणी.


प्रतिनिधि :- (मूल)

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत विशिष्ट शिक्षकांवर बी.एड.प्रकरण संबंधाने नाहक बदनामी होत असल्याने सेवेत असलेल्या सर्व विस्तार अधिकारी (शिक्षण ), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषयशिक्षक त्याचप्रमाणें जिल्हा परिषद हायस्कूल मधील शिक्षक या सर्वांचे बी.एड.पदवी प्रमाणपत्र तपासून वस्तुस्थिती समोर येण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त  स्तरावर स्वतंत्र चौकशी समिती गठीत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) चे सहकार्यवाह प्रकाश चुनारकर यांनी विभागीय आयुक्त , नागपूर यांचेकडे पाठविलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.
 शिक्षकांना शैक्षणिक अर्हता वाढविण्याची मुभा आहे.
यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदेला सादर करण्यात येतात. व त्यानुसार परवानगी दिली जाते.अथवा नाकारली जाते.
जिल्हा परिषद मध्ये बी.एड. या प्रमाणपत्राची पंचायत समिती स्तरावर /जिल्हा परिषद स्तरावर योग्य ती तपासणी करूनच त्यांना बी.एड.अह्रता लाभ देण्यात येतो. अशा वेळेस त्यात काही तांत्रिक चूका राहील्यास त्यास एकटा शिक्षक जबाबदार नसून संपूर्ण शिक्षण विभाग  जबाबदार असल्याने त्यांची सुद्धा चौकशीची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक ) ने पुढे म्हटले आहे की शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी दिनांक १२/१०/२० ला जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवून नियमित बी.एड.केलेल्या शिक्षकांची बी.एड.अहर्तेनुसार किंवा इतर देण्यात आलेल्या वेतनश्रेणी बाबतचा लाभ दिला याबाबतची सन २००५ ते सन २०११ पर्यंतची बी.एड.धारक शिक्षकांची माहिती मागितली आहे.परंतु या यादीत अनेक त्रृट्या असून त्याबाबतचे निवेदन आयुक्त नागपूर यांचेकडे पाठविण्यात आले आहे. सन २००५ पूर्वी त्याचप्रमाणें सन २०११ नंतरची बी.एड.ची वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी सुद्दा शिक्षक परिषदेने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!