दारू माफीया अविनास नवरखेडे यांची अवैध दारू येते तरी कुणाच्या आशिर्वादाने
पोलीस प्रशासन दारू माफीयाला अटक करून चौकशी करणार का ?
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - चिमूर तालुक्यात दारू माफीया अविनास नवरखेडे (हिंगणघाट) ईथुन अवैध दारू कुणाच्या आर्शिवादाने येत आहे.दि.११/१०/२०२० ला दारूबंदी पथक चंद्रपूर पोलीसानी भिसी पोलीस स्टेशन हद्दीत मौजा कपर्ला येथे ११:५० वाजता पकडण्यात आली. दिवसा-ढवळ्या बिनधास्त पणे दारू कशी का येत आहे.चिमुर तालुक्यातील पोलीस स्टेशन ला का हवा लागत नाही? किंवा मग यांचा आर्शिवाद तर नाही ना? जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालूक्यात आप - आपले तालूके दारू माफीयानी वाटप करून घेतले आहे.अशी दारू माफीयाची वृतपत्रा द्वारे बातमी प्रकाशित झाली होती.त्यात आता चिमुर तालूक्याची सुद्धा बोली तर लागली नाही ना?म्हणूनच चिमुर तालूक्यात खुले आम अवैध दारू येत अाहे.व तालूक्यात खुले अाम पणे अवैध दारू विक्री सुरु आहे.मागे एका लोक प्रतिनिधीने एक संदेश व्हॉट्सऍप ग्रुप वर व्हायरल केला गेला होता.४० लाख रुपये चिमुर पोलीस स्टेशन देणगी अवैध धंदेवल्याकडून येत असते.अवैध दारू,अवैध उत्खनन,गांजा,सट्टा,अवैध तंबाखु ,अवैध रित्या जनावराची तस्करी इत्यादी धंदेवाल्यांकडून देणगी येत असते असा आरोप एका लोकप्रतीधी ने केला होता.कितपत सत्य आहे हे येणारा काळच सांगेल.पण अवैध धंदा हा खुले अाम सुरू अाहे हे सत्य नाकारता येत नाही.दारू माफीया अविनास नवरखेडे (हिंगणघाट) यांची पोलीस विभागा कडून चौकशी होणार का ? ज्या पथ्दतीने चिमुर तालुक्यात अवैध दारू पुरवटा करीत अाहे यावरू दिसुन येते की चिमुर पोलीस विभागा अार्शिवादाने होत तर नाही ना? पुन्हा असे कित्येक दारू माफीया चिमुर तालुक्यात दारूचा पुरवठा करीत आहे यांची शुध्दा चौकसी होणे गरजे आहे.अवैध व्यवसायामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे.यामुळे चिमुर तालूक्यात गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे.या अवैध व्यवसायावर आळा तरी कधी बसणार?अशी सामान्य जनतेत चर्चा रंगू लागली अाहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!