बारव्हा परिसरातील चिकणा येतील गट क्रमांक ३५० मध्ये असलेला अवैध रेती साठा जप्त

लाखांदूर नायब तहसिलदार देविदासजि  पातोडे यांनी केली मोठी कार्यवाही

रेती तस्करांचे दनानले धाबे

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील बारव्हा परिसरातील ग्रामपंचायत चिकणा गट क्रमांक. ३५० मध्ये रेती तस्करांनी रात्रीच्या सुमारास १० ते २० ब्रास अवैद्ये रित्या रेतीची वाहतुक करुन साठवणुक करुन ठेवली होती आणि दुसर्या दिवशी रात्रीच्याच सुमारास अंधाराचा फायदा घेऊन व कार्यालयीन कामकाज सांयंकाळी बंद होत असल्यामुळे याचाच फायदा घेऊन रेतीला सोन्यासारखी कीमंत मिळत असल्यामुळे रेतीची तस्करांची संख्या वाढली असुन लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या नादाने अवैद्ये मार्गाने वाहतुक करुन साठवणुक करुन ३००० ४००० रुपये ब्रासच्या भावाने विक्री केल्या जाते मात्र 
दिनांक.१३/१०/२०२० रोज मंगळवार ला लाखांदुर तहसिल चे नायब तहसिलदार देविदासजि पातोडे यांनी  सांयंकाळी ०६ ते ०७ व वाजेच्या दरम्यान अवैद्ये रित्या साठवणुक केलेला रेती साठ्याचा पंचनामा करुन तहसिल कार्यालय लाखांदुर येथे जमा करण्यात आला असुन रेती तस्करांचे धाबे दनानले आहेत लाखांदुर तालुक्यातील बारव्हा परिसरातील ही सगळ्यात मोठी कार्यवाही आहे असी जनसामांन्या मध्ये चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!