वाघाला जेरबंद करण्यासाठी शेतकरी शेतमजूराचे रस्ता रोको आंदोलन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - दिनांक.१२/१०/२०२० रोजी शेतकरी शेतमजूर समन्वय समिती टेबूंरवाहि /तुलाना च्या वतीने निष्पाप शेतकरी शेतमजुरांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.त्यामध्ये प्रामुख्याने मागणी (१)वाघाला जेरबंद करण्यात यावे. (२)मयत परीवाराला पचंविस लाख रुपये देण्यात यावे. (३)परीवारातिल सदस्याला रोजंदारी नौकरीवर सामावून घ्यावे. (४)कसुरवार अधिकार्यांना निलंबित करण्यात यावे.अश्या विविध मागण्या मागण्यात आल्या. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले सात दिवसात वाघाला जेरबंद करण्यात येईल असे सांगण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे , अविनाश जाधव , चेतन जयपुलकर , बापुराव मडावी , दिपक मडावी , घनशाम मेश्राम , महिपाल मडावी , नितिन सीडाम हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!