एस.आर.के कंपनी च्या अवैध गीट्टी खदानीवर खनिकर्म विभागाची धाड
सहा हाईवा ट्रक व पोकलँड मशीनवर जप्तीची केली कार्यवाही
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - चिमूर वरोरा या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई रस्त्याचे काम एस.आर.के कंट्रक्शन कंपनी कड़े सोपविन्यात आले होते. गेल्या ३ वर्षांपासून हे काम मंद गतीने सुरू असून या कंपनी मधे करोड़ो रूपयाचा व्यवहार होत आहे. या रोडचे तीन तेरा झाले असून रविवारी खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका शेतातील अवैध गिट्टी उत्खनन होत असल्याच्या कारणाने ६ हायवा ट्रक , १ पोकलँड मशीन जप्त केली असून तसा जप्ती पत्र या वाहनांना लावले आहे . विशेष म्हणजे चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्ग रोड़ चे बांधकाम करण्यासाठी या एस.आर.के. कंपनीने एका शेतकऱ्यांकडून त्याची शेती भाड़े तत्वावर घेतली असून त्या ठिकानातून अवैधरित्या गिट्टीचे उत्खनन गेल्या काही वर्षा पासून सुरु असून या गंभीर समस्सेकड़े संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून या गिट्टी क्रेशर मधून अवैधरित्या गिट्टीची अवैध तस्करी होत होती. या अवैध वाहतूक तसेच अवैधरित्या गिट्टीची तस्करी व या एस.आर.के कंपनी चा काळा बाजार प्रशासनच्या डोळ्या समोर होत असल्यामुळे अनेक आरोप होत होते.अखेर संबधीत खनिकर्म विभाग यांनी रविवारी मौका चौकशी करुण प्रत्यक्ष रित्या पाहणी केली असता दिनांक.११/ १०/२०२० रविवार ला सायंकाळी हि कारवाई करण्यात आली असून यात सहा हाइवा ट्रक व एक पोकलँड मशीन यावर कठोर करवाई करुण जप्त करण्यात आले.याचे सूचना पत्र व ( सील ) या वाहनवर चिपकवन्यात आले. सदर हि करवाई अ.न.खेड़कर भौ.मा.प्र. यांनी केली असून पुन्हा या कंपनी तसेच यांच्या वाहनावर व गिट्टी खदान तसेच क्रेशर वर कोणती करवाई होनार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आणि आजपावेतो हे अवैध उत्खनन कुणाच्या आशिर्वादाने होत होते याकडे सुद्धा जनतेचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!