शेतक-यांनी पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेचे लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
शेतकऱ्यांनी पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेचे लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
शेतकऱ्यांसाठी २,३०,००० रूपयाचे अनुदान
पहिल्या टप्यात ६०% अनुदान दुसऱ्या टप्यात ४०% अनुदान
शेतकऱ्यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे
शशिकांत बतकमवार सिंदेवाही प्रतिनिधि
सिंदेवाही:-
शेतकऱ्यांना धान पिका सोबतच भाजीपाला उत्पादनाची जोड मिळाल्यास त्यांच्या आर्थीक उत्पादनात वाढ होईल व शेतकरी सक्षम होईल . त्यामुळे आत्महत्या कमी होईल या उदात्त हेतुने भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या जातीच्या रोपांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे दर्जेदार किड व रोगमुक्त भाजीपाल्याची रोपे तयार करून देणाऱ्या रोपवाटीका निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने ' पुण्यश्लोक सिंदेवाहीअहील्यादेवी होळकर रोपवाटीका योजना'सन २०२०-२१सुरू केली आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांकडुन विहीत मुदतीत अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेसाठी इच्छुक शेतकरी'महा डि बी टी या संकेत स्थळावर अर्ज करू शकतात अथवा अधिक माहीतीसाठी शेतकऱ्यानी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा कृषि सहाय्यक ,कृषि पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करने आवश्क आहे.
यात काहीनअटी देण्यात आले आहे .त्या शेतकऱ्यांनी पुर्ण करने आवश्यक आहे. एका रोपवाटीकेसाठी अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या मालकीची १ एकर जमीन कायम पाण्याचे सोईसह असने आवश्यक आहे. अर्जदारामध्ये महीला कषि पदविधर यांना प्रथम प्राधान्य , महीला गट महीला शेतकरी यांना दुसरे प्राधान्य व भाजीपाला उत्पादक अल्प / अत्यल्प / भुधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य असनार आहे.
एका रोपवाटीकासाठी एकुन अनुदान २,३०,०००/-रूपये असुन प्रकल्प उभारनी पुर्ण झाल्यावर आणि उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या मार्फत प्रथम मोका तपासनी नंतर ६०% अनुदान नियमाप्रमाने डि वी टी पद्धतीने दिले जानार आहे . तर उर्वरीत ४०% अनुदान रोपांची विक्री सुरू झाल्यानंतरच मंडळ कृषि अधिकारी यांचे मोका तपासणीनंतर दिले जानार आहे.
या सोजनेसाठी शेतकऱ्यांनी दिनांक १९ आक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावे असे आव्हान तालुका कृषि अधिकारी प्रमोद खेडकर यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!